दहिसर पश्चिम येथील एल.टी. मार्गवर असलेल्या आकाश मार्गिका अर्थात स्कायवॉक (Dahisar West Skywalk) पाडून आता नव्याने बांधले जाणार आहे. या स्कायवॉकचा काही भाग कोसळल्यानंतर याची दुरुस्ती वेळीच न करता ते पादचाऱ्यांसाठी बंद ठेवण्यात आले. त्यामुळे हे स्कायवॉक आता अधिक धोकादायक बनले असून जिथे काही कमी खर्चात होणाऱ्या दुरुस्तीचे वेळीच न झाल्याने आता हे स्कायवॉक तोडून बांधण्याची वेळी आहे आणि यासाठी आता तब्बल २४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.
दहिसर (पश्चिम) येथील एल.टी मार्गवरील सध्या अस्तित्वात असलेली आकाशमार्गिका अर्थात स्कायवॉक हे मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकण (एम. एम. आर. डी. ए) मार्फत सन २०१० साली बांधण्यात आले होते. हे स्कायवॉक सन २०१५ साली एम.एम.आर.डी.ए. कडून “जसे आहे तसे ” या तत्वावर मुंबई महापालिकेला सुपूर्द करण्यात आले होते. पण हे स्कायवॉक ताब्यात घेतल्यानंतर सन २०१६ मध्ये या स्कायवॉकचा काही भाग कोसळला गेला. त्यामुळे हे स्कायवॉक पादचाऱ्यांसाठी बंद करण्यात आले.
त्यानंतर मुंबई व्हीजेटीआयचे प्रा. डॉ. अभय बांबोळे यांच्या मार्फत स्कायवॉकची संरचनात्मक तपासणी अहवाल सादर केला होता. त्यात स्कायवॉकच्या जीर्ण स्लॅब तोडून मुख्य संरचनात्मक दुरुस्ती करण्याचे सुचविले होते. परंतु या स्कायवॉकची दुरुस्ती वेळीच न झाल्याने पुन्हा या स्कायवॉकची तपासणी एस सी जी कन्सल्टन्सी सर्विसेस या सल्लागाराने ०७ नोव्हेंबर २०२२ रोजी लेखापरिक्षण अहवाल केला त्या अहवालानुसार स्कायवॉकच्या ८ पैकी ७ जीन्यांसह आकाशमार्गिकेचा डेक स्लॅब धोकादायक अवस्थेत असल्याने ते बांधकाम पाडून त्याची पुनर्बाधणी करण्याची सल्लागाराने शिफारस केली.
(हेही वाचा-Women Health Care : मासिक पाळी नियमित करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा)
त्यानसार महापालिकेच्या पूल विभागाने या स्कायवॉकचे बांधकाम तोडून त्याच पुनर्बांधणी करण्यासाठी निविदा मागवण्यात आल्या आहेत. या निविदेमध्ये उणे ३३ टक्के दराने बोली लावत काम मिळवले आहे. यासाठी ३० कोटी रुपये खर्च केला जाणार असून या कामांसाठी स्वस्तिक कन्सल्ट्रक्शन या कंपनीची नियुक्ती केली आहे.
या स्कायवॉकची लांबी ८५० मीटर लांबी एवढी असून त्याची रुंदी ४ मीटर एवढी आहे. (Dahisar West Skywalk) सन २०१६मध्ये या स्कायवॉकचा भाग धोकादायक बनल्यानंतर त्याची दुरुस्ती तातडीने केली असती तर काही कोटींमध्ये याची दुरुस्ती होऊ शकली असती. परंतु याची वेळीच दुरस्तीचे काम केले असते तरी किती कोटी रुपये वाचू शकले असते आणि या स्कायवॉचा वापर पादचाऱ्यांसाठी करता आला असता. परंतु याची दुरुस्ती वेळच्या वेळी न झाल्याने तसेच ते बंद पडून राहिल्या ते अधिकच धोकादायक बनले आणि ते बांधकाम तोडून नव्याने पुनर्बांधणी करण्याची वेळ आली आहे. यासाठी विविध करांसह तब्बल ३० कोटी रुपये खर्च करण्याची महापालिकेवर आली आहे.
हेही पहा-
Join Our WhatsApp Community