- विशेष प्रतिनिधी, मुंबई
मुंबई किनारा रस्ते प्रकल्प (उत्तर) या प्रकल्पांतर्गत माईंड स्पेस मालाड ते चारकोप आणि चारकोप खाडी ते ते माईंडस्पेस या उत्तर व दक्षिण दिशेकडील बोगदा प्रकल्प कामांसाठी यापूर्वीच कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली असली तरी या प्रकल्पासाठी आता प्रकल्प व्यवस्थापन करण्यासाठी सल्लागाराची नेमणूक करण्यात आली आहे. एमआयपीएल-केएस (जेव्ही) या सल्लागार कंपनीची निवड करण्यात आली असून या सल्लागार सेवेसाठी तब्बल १६४ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत. (Coastal Road)
(हेही वाचा – Assembly Election 2024 : मालाडमधून शेलारांना उमेदवारी, अस्लमसाठी फुलटॉस की यॉर्कर)
मुंबई शहरामध्ये होणाऱ्या वाहतुकीची कोंडी दूर करण्यासाठी व त्या अनुषंगाने अधिका-अधिक वाहतुकीसाठी रस्त्याचे जाळे विकसित करण्यासाठी विविध प्रकारच्या वाहतुकीचा अभ्यास करण्यात आला. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण व मुंबई महानगरपालिकेमार्फत केलेल्या वाहतुकीच्या अभ्यासाचा अहवाल व मुंबई किनारा रस्त्याकरिता संयुक्त तांत्रिक समिती (२०११) यांचा अहवाल व त्यांच्या शिफारसी या सर्व बाबींच्या अनुषंगाने वर्सोवापासून पुढे गोरेगाव, मालाड, चारकोप, दहिसर, भाईदर दरम्यानच्या किनारी रस्त्याचे काम मुंबई महानगरपालिकेने हाती घेण्यात आलेले आहे. (Coastal Road)
(हेही वाचा – Baba Siddique Murder : मुंबईत पुन्हा गॅंगवॉर, दाऊद टोळी पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता)
या कोस्टल रोड प्रकल्पांतर्गत १४.२० मीटर अंतर्गत व्यासाचे ३००० मीटर लांबीच्या जुळ्या बोगद्याचे काम बांधकाम, ७०० मीटर लांबीचे कट आणि कव्हर बोगद्याचे बांधकाम तसेच २०० मीटर लांबीच्या उतार रस्त्याचे बांधकाम तसेच एकूण ३.९ किमी लांबीचे प्रत्येकी असलेले उत्तर व दक्षिण जाणारे बोगदे आदी घटकांचा समावेश आहे. या कामासाठी प्रकल्प सल्लागार तथा सामान्य सल्लागार म्हणून टंडन अर्बन सोल्युशन या कंपनीची म्हणून निवड केली आहे. तर या प्रकल्पांतील पॅकेज सी व डिच्या संरचना व बांधकाम धर्तीवर हाती घेतलेल्या प्रकल्प कामाकरता प्रकल्प व्यवस्थापन व सल्लागार सेवा यांची नेमणूक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी मागवलेल्या निविदेमध्ये एमआयपीएल-केएस (जेव्ही) ही कंपनी पात्र ठरली आहे. या प्रकल्पाचे काम ५४ महिन्यांमध्ये पूर्ण केले जाणे अपेक्षित आहे. (Coastal Road)
(हेही वाचा – Muhurat Trading : यंदा १ नोव्हेंबरला होणार दिवाळीचं मुहूर्ताचं ट्रेडिंग)
या प्रकल्पांसाठी कशाप्रकारे होणार काम आणि नियुक्त कंत्राट कंपनी
पॅकेज ए : वर्सोवा आंतरबदल ते बांगूरनगर (उन्नत मार्ग)
कंपनी : ऍपको इन्फ्राप्रोजेक्ट
पॅकेज बी : बांगूर नगर ते माईंड स्पेस मालाड व माईंड स्पेस ते जीएएमएलआर कनेक्टर
कंपनी : जे कुमार-एनसीसी संयुक्त भागीदार
पॅकेजी सी : माईंड स्पेस मालाड ते चारकोप खाडी भुयारी मार्ग
कंपनी : मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्टक्चर्स
पॅकेज डी : चारकोप खाडी ते माईंड स्पेस मालाड दक्षिणेकडे जाणारा भुयारी मार्ग
कंपनी : मेघा इंजिनिअरींग आणि इन्फ्रास्टक्चर्स
पॅकेज ई : चारकोप खाडी ते गोराई आंतरबदल उन्नत मार्ग
कंपनी : एल अँड टी प्रायव्हेट लिमिटेड
पॅकेज एफ : गोराई आंतरबदल ते दहिसर आंतरबदल उन्नत
कंपनी : ऍपको इन्फ्राटेक
हेही पहा –
Join Our WhatsApp Community