घाटकोपरच्या उद्यानात १६४ वर्षांपूर्वीच्या तोफा!

५५ हजार ८४३ चौरस फुटांच्या जागेत विकसित असलेल्या या उद्यानात असणाऱ्या हिरवाई सोबतच ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील दोन तोफा देखील या आकर्षणाचा केंद्रबिंदू बनल्या आहेत.

146

समुद्राने वेढलेल्या मुंबई नगरीचे संरक्षण करण्यासाठी ब्रिटिशांनी अनेक ठिकाणी तोफा बसविल्या होत्या. यापैकी तब्बल १६४ वर्षे जुन्या असणाऱ्या, पण तरीही भरभक्कम असणाऱ्या दोन पौलादी तोफा महापालिकेच्या घाटकोपर परिसरात असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’मध्ये बसवल्या जाणार आहेत.

एक नवी झळाळी मिळावी, या दृष्टीने या दोन्ही तोफा भव्य-दिव्य पद्धतीने पुन्हा स्थापित करण्याच्या प्रस्तावास अतिरिक्त महापालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे यांनी मंजुरी दिली असून प्रस्ताव पुढील आवश्यक त्या कार्यवाहीसाठी पुरातन वास्तू जतन अभियंता यांच्याकडे पाठविण्यात आला आहे. त्यामुळे आता लवकरच घाटकोपर पूर्व परिसरातील टिळक पथावर असणाऱ्या ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ मध्ये निसर्गाशी जवळीक साधण्यासोबतच तोफारुपी ऐतिहासिक ठेवाही अनुभवता येणार आहे.
– जितेंद्र परदेशी, उद्यान अधीक्षक

‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील तोफा 

मुंबई महानगरपालिकेच्या उद्यान विभागाच्या अखत्यारीत असणा-या घाटकोपर पूर्व परिसरातील ‘लायन्स चिल्ड्रन पार्क’ हे सन १९७१ पासून मुंबईकरांच्या सेवेत असणारे उद्यान आहे. ५५ हजार ८४३ चौरस फुटांच्या जागेत विकसित असलेल्या या उद्यानात असणाऱ्या हिरवाई सोबतच ‘ईस्ट इंडिया कंपनी’च्या काळातील दोन तोफा देखील या आकर्षणाचा केंद्रबिंदू आहेत. या दोन्ही तोफांची लांबी ३.१० मीटर असून तोफांचा आतील घेर हा ०.६४ मिटर आणि बाहेरील घेर १.१७ मीटर इतका आहे.

(हेही वाचा : वादात सापडलेले मुंबई पोलीस प्रशासन कोण-कसे चालवते? जाणून घ्या!!)

ऐतिहासिक ठेव्याला नवा‌ रुबाब प्राप्त होणार!  

या दोन्ही तोफांवर १,८५६ अशी नोंद असून एका बाजूला रोमन लिपीमध्ये ‘एनसीपीसी’अशी अक्षरे कोरण्यात आली आहेत. साधारणपणे १६४ वर्षे जुन्या असणार्‍या या दोन्ही तोफांना नवी झळाळी देण्यासह त्या भव्य-दिव्य चबुतऱ्यावर पुनर्स्थापित करण्याचा प्रस्ताव महापालिकेच्या उद्यान विभागाने महापालिकेच्या पुरातन वास्तू जतन अभियंता यांच्याकडे नुकताच पाठविला आहे. यामुळे आता लवकरच या ऐतिहासिक ठेव्याला नवा‌ रुबाब प्राप्त होण्यासह मुंबईकरांना देखील एक ऐतिहासिक स्पर्श असलेले विरंगुळ्याचे आणखी एक ठिकाण उपलब्ध होणार आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.