मुंबई -अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावर वर्षभरात 168 अपघात; Safety Audit ची गरज

137

उद्योगपती सायरस मिस्त्री यांचा पालघर- चारोटी येथे रविवारी झालेल्या अपघातात निधन झाले. त्यामुळे मुंबई- अहमदनगर मार्गावरील अपघातांची भीषणता पुन्हा एकदा समोर आली आहे. गेल्या वर्षभरात कासा पोलीस स्टेशनांतर्गत जवळपास 168 अपघात झाले आहेत. अन्य भागांतील आकडेवारीही यापेक्षा कमी नाही. त्यामुळे या राष्ट्रीय महामार्गाची रचना, रस्त्यावरील वाहतुकीचा ताण व त्यात अपेक्षित असलेल्या आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन या रस्त्याचे सेफ्टी ऑडिट करण्याची गरज व्यक्त केली जात आहे.

मुंबई- अहमदनगर या राष्ट्रीय महामार्गावर मागील काही वर्षांत अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. पालघर जिल्ह्यात अपघातप्रवण क्षेत्रातील अपघातांची संख्या काही पटीने अधिक असल्याचे दिसून आलेले आहे.

याकडे सरकार लक्ष देणार का?

  • मुंबई- अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील मेंढवण, सोमटा, तवा, चोरटी, महालक्ष्मी, धनिवरी, आंबोली या भागांमध्ये अपघातांची मालिका सुरुच आहे.
  • महामार्गावर बंद पडलेली व अपघातग्रस्त वाहने हटवण्यासाठी आवश्यक यंत्रणेचा अभाव आहे.
  • पाणी निचरा होण्याचे मार्ग बंद झालेले आहेत. पथदिवे बंद असतात. अपघात रोखण्यासाठीच्या कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नसल्याने महामार्ग समस्यांच्या विळख्यात सापडलेला आहे.

( हेही वाचा: राज ठाकरेंना दसरा मेळाव्याला बोलवणार का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले… )

सहाऐवजी काही ठिकाणी चारच मार्गिका

  • निविदेत सहा मार्गिका अंतर्भूत असताना प्रत्यक्षात मात्र काही ठिकाणी चार मार्गिका आहेत.
  • आवश्यक त्या ठिकाणी रंबलर्स, कॅट आईज, धोक्याची सूचना देणारे फलक, वेगमर्यादा दर्शवणारे फलक, रिफ्लेक्टर तसेच 50, 100, 200 मीटरवर झेब्रा क्राॅसिंगच्या पट्ट्या तसेच किलोमीटर दर्शक फलक अशा उपाययोजना करण्याकडे प्राधिकरणाने पाठ फिरवलेली आहे.
  • त्यामुळे या महामार्गाची रचना, रस्त्यावरील वाहतुकीचा ताण व आवश्यक सुधारणा लक्षात घेऊन या रस्त्याचे सेफ्टी ऑडिट करणे गरजेचे असल्याचे मत अनेकजण व्यक्त करत आहेत.

Join Our WhatsApp Community

Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.