Manholes : मलवाहिन्यांच्या साफसफाईचा मार्ग मोकळा; ‘त्या’ सात वाहनांच्या देखभाली आणि प्रचालनासाठी सुमारे १७ कोटींचा खर्च

70
Manholes : मलवाहिन्यांच्या साफसफाईचा मार्ग मोकळा; 'त्या' सात वाहनांच्या देखभाली आणि प्रचालनासाठी सुमारे १७ कोटींचा खर्च
  • सचिन धानजी, मुंबई

मुंबईतील मलनि:सारण वाहिन्यांमधील मलाचा प्रवाह सुरळीत राखण्यासाठी मलनि:सारण प्रचालन विभागाच्यावतीने मे २०२३मध्ये सात वाहनांवर बसवलेले रोबोटिक आधारीत गटार साफ करणारी यंत्रे खरेदी केले. या सात यंत्रांच्या खरेदीनंतर एक वर्षांच्या हमी कालावधीनंतर नव्याने देखभाल आणि प्रचालनासाठी कंत्राटदार नियुक्त न केल्याने रोबोटिक वाहने असूनही मलवाहिन्यांची स्वच्छता राखली जात नव्हती. अखेर रोबोटिक वाहनांच्या देखभाल आणि प्रचालनासाठी सात वर्षांसाठी कंत्राट कंपनीची निवड केली आहे. त्यामुळे वाहने खरेदी केल्यानंतर आता देखभाल आणि प्रचालनासाठी सात वर्षांसाठी सुमारे १६.२८ कोटी रुपये खर्च केले जाणार आहे. या देखभाल आणि प्रचालनासाठी आयजिन क्लिनिंग सर्व्हीसेस प्रायव्हेट लिमिटेड कंपनीची निवड करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबईतील अनेक गळत्या आणि तुंबलेल्या मलवाहिन्यांची साफसफाई करून मलप्रवाह सुरळीत राखण्यात येईल. (Manholes)

(हेही वाचा – Balasaheb Thackeray Central Vaitrana Dam : पुढील अडीच वर्षांत सौर आणि जलविद्युत प्रकल्पातून प्रत्यक्षात विजेचा वापर)

मलवाहिन्यांची साफसफाई ही मॅनहोल्समधून (Manholes) पूर्वी मैला हाताने काढून केली जात होती. केंद्राच्या हाताने मैला उलचणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांच्या सेवा योजनेस प्रतिबंध आणि त्यांचे पुनर्वसन अधिनियम २०१३ हा कायदा कर्मचाऱ्यांना गटारांच्या धोकादायक साफसफाईसाठी प्रतिबंधित आहे. त्या अंतर्गत स्थानिक स्वराज्य संस्थांना मलवाहिन्यांच्या साफसफाईकरता अद्ययावत तंत्रज्ञानावर आधारीत कार्यप्रणाली वापरण्यास सुचित केले आहे. त्यानुसार महापालिका प्रशासनाने अत्यंत अत्याधुनिक आणि तांत्रिकदृष्ट्या प्रगत रोबोटिक आधारित गटार साफ करणारे यंत्रांची खरेदी करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार पश्चिम उपनगरे ०३, शहर भाग २ आणि पूर्व उपनगरे ०२ अशाप्रकारे सात वाहनावर आधारित रोबोटिक आधारित यंत्रांचा खरेदी करण्यास मे २०२२ मध्ये मंजूरी देण्यात आली. त्यानुसार ही वाहने मे २०२३ मध्ये ताब्यात आल्यानंतर याचा एक वर्षांचा हमी कालावधी संपुष्टात आला. (Manholes)

(हेही वाचा – महापालिका जी उत्तर आणि पी उत्तरमधील Mahila Bachat Gat च्या अनुक्रमे रेणुका सोनावणे, सीमा पाताडे ठरल्या स्वच्छतादूत)

हमी कालावधी हा संपुष्टात आल्यानंतर या वाहनांचे प्रचालन आणि देखभाल होत नसल्याने अनेक ठिकाणी मलवाहिन्यांची साफसफाई करताना अडचणी येत होत्या. प्रचालन व देखभालीसाठी कंत्राटदार नसल्याने मलवाहिन्यांमधील मलप्रवाह सुरळीत राखण्यात अनेक अडचणी येत होत्या. परंतु आता यासाठी कंत्राटदार नेमला गेल्याने मलप्रवाह सुरळीत राखण्याचे काम होऊ शकते. या सातही वाहनांसाठी वर्षाला सुमारे दोन कोटींचा खर्च येत असून सात वर्षांसाठी या सात वाहनांच्या देखभाल व प्रचालनासाठी तब्बल १६ कोटी ८३ लाख ९१ हजार १६२ रुपये खर्च केला जाणार आहे. (Manholes)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.