पृथ्वीवर परतण्यासाठी १७ तास; ७ मिनिटे संपर्क तुटला; Sunita Williams यांचा परतीचा प्रवास कसा होता ?

84

भारतीय वंशाच्या अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स (Sunita Williams), बुच विल्मोर (Butch Wilmore) ९ महिने १४ दिवसांनी पृथ्वीवर परतले आहेत. ते परण्याची प्रतीक्षा सर्वांनाच लागली होती. त्यांच्यासोबत क्रू-९ चे आणखी दोन अंतराळवीर होते. अमेरिकेचे निक हेग आणि रशियाचे अलेक्झांडर गोर्बुनोव अशी त्यांची नावे आहेत. ९ मार्च रोजी भारतीय वेळेनुसार पहाटे ३:२७ वाजता त्यांचे ड्रॅगन अंतराळयान फ्लोरिडाच्या किनारपट्टीवर उतरले.

(हेही वाचा – Pune University चे वसतिगृहच बनले मुलींचा दारूचा अड्डा; तक्रार करूनही दुर्लक्ष)

परतीच्या प्रवासात ७ मिनिटे संपर्क तुटला

हे चार अंतराळवीर मंगळवारी (१८ मार्च) आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावरून (International Space Station) निघाले होते. जेव्हा यानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला, तेव्हा त्याचे तापमान १६५० अंश सेल्सिअसपेक्षा जास्त होते. या कालावधीत सुमारे ७ मिनिटे दळणवळण ठप्प होते, म्हणजेच वाहनाशी संपर्क झाला नाही. ड्रॅगन कॅप्सूल वेगळे होण्यापासून ते समुद्रात उतरण्यासाठी सुमारे १७ तास लागले. १८ मार्च रोजी सकाळी ८:३५ वाजता अंतराळयान बाहेर पडले, म्हणजेच दार बंद झाले. १०:३५ वाजता अंतराळयान ISS पासून वेगळे झाले. १९ मार्च रोजी पहाटे २:४१ वाजता डीऑर्बिट बर्नला सुरुवात झाली. अवकाशयानाचे इंजिन कक्षेतून विरुद्ध दिशेला उडवले गेले. यामुळे अंतराळयानाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आणि पहाटे ३:२७ वाजता फ्लोरिडाच्या (Florida) किनाऱ्यावरील पाण्यात उतरले.

८ दिवसांच्या मिशनवर, पण ९ महिन्यांपेक्षा जास्त वेळ

सुनीता विल्यम्स (Sunita Williams) आणि बुच विल्मोर (Butch Wilmore) बोइंग आणि नासाच्या ८ दिवसांच्या संयुक्त ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’वर (Crew Flight Test Mission) गेले. या मोहिमेचा उद्देश बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानाच्या अंतराळवीरांना अंतराळ स्थानकावर ये-जा करणाऱ्या क्षमतेची चाचणी करणे हा होता. अंतराळवीरांनाही अवकाश स्थानकावर ८ दिवसांत संशोधन आणि अनेक प्रयोग करावे लागले. थ्रस्टर खराब झाल्यामुळे त्यांचे ८ दिवसांचे मिशन ९ महिन्यांहून अधिक झाले.

अंतराळात सर्वाधिक काळ रहाण्याचा विक्रम कोणाच्या नावावर ?

रशियन अंतराळवीर व्हॅलेरी पॉलीकोव्ह यांच्या नावावर अंतराळात सर्वाधिक काळ राहण्याचा विक्रम आहे, त्यांनी ८ जानेवारी १९९४ ते २२ मार्च १९९५ पर्यंत मीर स्पेस स्टेशनवर ४३७ दिवस घालवले. ISS वर सर्वाधिक काळ (३७१ दिवस) रहाण्याचा विक्रम फ्रँक रुबियो यांच्या नावावर आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.