विशेष प्रतिनिधी, मुंबई
महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरण (Mhada) व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण (SRA) यांच्यामार्फत संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबविल्या जाणाऱ्या १७ झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पांना गती देण्याचे निर्देश ‘म्हाडा’चे उपाध्यक्ष तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संजीव जयस्वाल (Sanjeev Jaiswal) यांनी दिले. दोन्ही प्राधिकरणांनी एकमेकांशी समन्वय साधून झोपडीधारकांची पात्रता निश्चिती, प्रशासकीय मान्यता, निविदा प्रक्रिया काम तात्काळ सुरू करण्याचे निर्देश संजीव जयस्वाल दिले. (Mhada)
या रखडलेल्या पुनर्वसन प्रकल्पांच्या माध्यमातून म्हाडाला सुमारे २५००० अतिरिक्त गृहसाठा उपलब्ध होण्याचे उद्दिष्ट आहे. या पुनर्वसन प्रकल्पांतून प्रकल्पग्रस्तांसाठी किती घरे निर्माण होतील याबाबतचा आढावाही सोमवारी घेण्यात आला. या प्रकल्पांमधील अपात्र झोपडपट्टीधारकांना निष्कासित करण्याची कार्यवाही दोन्ही प्राधिकरणांनी तात्काळ करावी, असेही निर्देश संजीव जयस्वाल यांनी दिले.
(हेही वाचा – ऊर्जा विभागाच्या retired engineers ची अधिकाऱ्यांकडून अवहेलना!)
म्हाडा व झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणातर्फे संयुक्त भागीदारी तत्त्वावर राबवल्या जाणाऱ्या पुनर्विकास प्रकल्पांमध्ये मालवणी मालाड येथील प्रकल्प सर्वात मोठा असून या ठिकाणी १४००० झोपडीधारक आहेत. या सर्व झोपडीधारकांचे बायोमेट्रिक सर्वेक्षण करण्याच्या सूचना संजीव जयस्वाल यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. त्याकरिता अतिरिक्त मनुष्यबळाचा वापर करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले. म्हाडासोबत करावयाच्या १७ प्रकल्पांपैकी ज्या प्रकल्पांच्या ठिकाणी पोहोच रस्ता नसेल त्या ठिकाणी पोहोचण्याकरता दोन्ही प्राधिकरणांनी तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश जयस्वाल यांनी दिले. म्हाडाच्या ज्या जमिनीवर झोपड्या आहेत त्या झोपडीधारकांचेही बायोमेट्रिक सर्वेक्षण (Biometric Survey) करण्याचा कालबद्ध कार्यक्रम हाती घेण्यात यावा, असे निर्देश जयस्वाल यांनी संबंधित अधिकार्यांाना दिले.
हेही पाहा –