गोवंडीत गोवरचे रुग्ण कुर्ल्यातही गोवरचा उद्रेक झाला आहे. दोन्ही विभागात प्रत्येकी पाच वेगवेगळ्या विभागांत कोरोनाचा उद्रेक झाला आहे. मुंबईत सध्या २ हजार ८६० बालकांना गोवरची बाधा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. ९ महिने ते ५ वर्षांपर्यंतच्या मुलांची गोवर लस राहिली असल्यास तातडीने मुलांना पालिका दवाखान्यात लस द्या, असे आवाहन पालिका आरोग्य विभागाने केले आहे.
१७६ गोवरबाधितांवर उपचार देताना आता रुग्णालयीन व्यवस्थेवरही आव्हान उभे राहिले आहे. गोवंडीतील शताब्दी रुग्णालय, शिवाजी नगर येथील नागरी आरोग्य केंद्र तसेच कस्तुरबा रुग्णालयात संशयित गोवरबाधित रुग्णांना दाखल केले जात आहे. मात्र शिवाजी नगर येथील नागरी आरोग्य केंद्र सुरु झाले आहे का, याबाबतची नेमकी माहिती मिळालेली नाही.
- ऑक्सिजनवर उपचारावर असलेले रुग्ण – ७
- कृत्रिम श्वासोच्छवासावर असलेले रुग्ण – २
बालकांमधील या लक्षणांमागे दुर्लक्ष नको –
- लहान मुलांमधील रोगप्रतिकारकशक्ती कमी होणे
- अतिसार
- न्युमोनिया
- कुपोषण
- उद्रेकाचे विभाग
- एम पूर्व, एल – प्रत्येकी ५
- एफ-उत्तर, जी-उत्तर, एम-पश्चिम,पी-उत्तर – १