आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सर्वसामान्यांचे लक्ष आता पेट्रोल-डिझेलच्या किमतींकडे लागले आहे. अशातच देशातील तेल कंपन्यांनी शुक्रवार (१८ ऑगस्ट) पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर केले असून, देशातील महानगरांमधील पेट्रोल-डिझेलचे दर आजही स्थिर आहेत. देशातील काही जिल्ह्यांमध्ये मात्र पेट्रोल-डिझेलच्या किमतींमध्ये किरकोळ बदल पाहायला मिळत आहे.
एका वर्षांहूनही अधिक काळ देशातील किमती स्थिर –
एक वर्षाहूनही अधिक काळ लोटला असून देशातील तेल कंपन्यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या दरांत मात्र कोणताही बदल केलेला नाही. केंद्र सरकारकडून अद्याप किमतीतील बदल किंवा सवलतीबाबत कोणतीही विशिष्ट घोषणाही करण्यात आलेली नाही.
कुठल्या राज्यात काय दर?
पुणे – पेट्रोलचे दर १०५.९६ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९२.४८ रुपये प्रति लिटर.
नाशिक – पेट्रोलचे दर १०६.७७ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९३.२७ रुपये प्रति लिटर.
अहमदनगर – एक लिटर पेट्रोल १०६.९६ रुपये, तर एक लिटर डिझेल ९३.४६ रुपयांना.
सिंधुदुर्ग – पेट्रोलची किंमत १०८.०१ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९४.४८ रुपये प्रति लिटर.
सोलापुर – एक लिटर पेट्रोल १०६.२० रुपयांना, तर एक लिटर डिझेल ९२.७४ रुपयांना.
कोल्हापुर – एक लिटर पेट्रोल १०६.४७ रुपये प्रति लिटर, तर एक लिटर डिझेल ९३.०१ रुपये प्रति लिटर.
नागपुर – पेट्रोल १०६.०६ रुपये प्रति लिटर, तर डिझेल ९२.६१ रुपये प्रति लिटर.
गडचिरोली – १०७.२४ रुपये प्रति लिटर पेट्रोल, तर डिझेल ९३.७६ रुपये प्रति लिटर.
(हेही वाचा – NIA Raids : संशयित दहशतवादी शमिल नाचनच्या घरावर छापा, महत्वाचे पुरावे लागले एनआयएच्या हाती)
या ठिकाणी पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर –
दिल्ली – पेट्रोल ९६.७२ रुपये आणि डिझेल ८९.६२ रुपये प्रति लिटर.
मुंबई – पेट्रोल १०६.३१ रुपये आणि डिझेल ९४.२७ रुपये प्रति लिटर.
कोलकाता – पेट्रोल १०६.०३ रुपये आणि डिझेल ९२.७६ रुपये प्रति लिटर.
चेन्नई – पेट्रोल १०२.६३ रुपये आणि डिझेल ९४.२४ रुपये प्रति लिटर.
रोज सकाळी ६ वाजता होतात दर अपडेट –
रोज सकाळी ६ वाजता पेट्रोल आणि डिझेलच्या दरात बदल होतो. एक्साईज ड्युटी, डीलर कमिशन, व्हॅट आणि इतर गोष्टी जोडल्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किमती मूळ किमतींपेक्षा दुप्पट होते. या कारणामुळेच पेट्रोल-डिझेलचे दर वाढलेले दिसत आहेत.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community