कोकण रेल्वेमार्गावरील १८ एक्स्प्रेस गाड्या मंगळवारपासून धावणार विद्युत वेगाने!

मुंबई-पुण्याहून कोकणात जाणारे हजारो चाकरमानी कोकण रेल्वेने प्रवास करतात. कोकण रेल्वेमार्गावरील सर्वांत महत्त्वाची मांडवी एक्स्प्रेस तसेच कोकणकन्या एक्सप्रेस मंगळवार २० सप्टेंबरपासून विद्युत इंजिनवर धावणार आहेत. यापाठोपाठ येत्या काही दिवसांत कोकण रेल्वेच्या मार्गावरून एकूण १८ गाड्या विजेवर चालविल्या जाणार आहेत.

( हेही वाचा : Traffic Rules : ट्राफिक पोलीस तुमच्या गाडीची चावी काढून घेऊ शकतात का ? जाणून घ्या नियम)

कोकण रेल्वेच्या संपूर्ण मार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाल्यामुळे गेल्या वर्षी या मार्गावरून मालगाड्यांची वाहतूक सुरू झाली. आता रत्नागिरीतील ट्रॅक्शन सब स्टेशनचे उर्वरित काम पूर्ण झाल्यामुळे टप्प्याटप्प्याने सर्वच प्रवासी गाड्या विद्युत इंजिनवर चालवण्याचे नियोजन रेल्वेकडून करण्यात आले आहे.

मंगळवारपासून मुंबई सीएसटी ते मडगाव दरम्यान धावणाऱ्या कोकणकन्या तसेच मांडवी एक्स्प्रेस या दोन्ही गाड्या विद्युत इंजिनवर धावणार आहेत. कोकण रेल्वेमार्गे रेल्वेच्या अन्य झोनमधील धावणाऱ्या गाड्या विजेवर चालवण्याचे नियोजन टप्प्याटप्प्याने जाहीर केले जात आहे.

या तारखांना इतर गाड्यांना विद्युत इंजिन लागणार

  • १५ सप्टेंबरपासून सुरू – दादर ते सावंतवाडी एक्स्प्रेस, तुतारी एक्स्प्रेस, मंगला एक्स्प्रेस
  • २० सप्टेंबर २०२२ – मांडवी, कोकणकन्या, दिवा-सावंतवाडी एक्स्प्रेस
  • १५ ऑक्टोबर २०२२ – जनशताब्दी एक्स्प्रेस, तेजस एक्स्प्रेस
  • १ जानेवारी २०२३ – मुंबई-मंगलोर एक्स्प्रेस

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here