१ एप्रिल २०१९ पूर्वीच्या सर्व जुन्या वाहनांना आता ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ (HSRP) लावणे सक्तीचे करण्यात आले आहे. या ‘हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट’ची (High security registration number plate) किंमत इतर राज्यांपेक्षा महाराष्ट्रात जास्त आहे. त्यावर वाहनधारकांना १८ टक्के जीएसटी द्यावा लागणार आहे, असे समोर येत आहे. हा १८ टक्के जीएसटी वाहनधारकांना द्यावा लागणार असल्याचे समोर येत आहे.
(हेही वाचा – Swargate Bus Depot तील प्रकरणात तरुणीच्या मेडिकल रिपोर्टमध्ये धक्कादायक माहिती उघड)
१ एप्रिल २०१९ च्या पूर्वीच्या वाहनांना ३१ मार्च २०२५ पूर्वी ही नंबर प्लेट बसवणे बंधनकारक केले होते. मात्र आता एचएसआरपी नंबरप्लेटसाठी एक महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे. त्यामुळे ३० एप्रिल २०२५ नंतर रस्त्यावर एचएसआरटी नंबर प्लेट शिवाय वाहन आढळले, तर मोटर वाहन कायद्यानुसार कारवाई करण्यात येणार आहे.
जीएसटीसह किती होणार रक्कम ?
मोटर सायकल आणि ट्रॅक्टरसाठी ४५० रुपये + जीएसटी, थ्री व्हीलरसाठी ५०० रुपये जीएसटी आणि फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी ७४५ रुपये जीएसटी (GST) एवढेच परिवहन खात्यामार्फत सांगण्यात येत आहे. मात्र त्यावर १८ टक्के जीएसटीही द्यावा लागणार आहे. मोटर सायकल आणि ट्रॅक्टर साठी ४५० रुपये १८ टक्के जीएसटी म्हणजे ८१ रूपये धरून ५३१ रूपये, फोर व्हीलर आणि इतर वाहनांसाठी ७४५ रुपये १८ टक्के जीएसटी म्हणजे १३४ रूपये धरून ८७९ रूपये आणि थ्री व्हीलरसाठी ५०० रुपये + १८ टक्के जीएसटी म्हणजे ९० रूपये धरून ५९० रूपये वाहनधारकांना द्यावे लागणार आहे.
सध्या राज्यात १ एप्रिल २०१९ पूर्वीच्या अंदाजे १ कोटी ३० लाख दुचाकी, २२ ते २५ लाख चार चाकी आणि ४० ते ४५ लाख तीन चाकी गाड्या आहेत. या गाड्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावायची आहे. यामध्ये मोटर सायकल आणि ट्रॅक्टर साठी ४५० रुपये + १८ टक्के जीएसटी धरून ६९० कोटी होतात, तर चार चाकींसाठी १५० कोटी होतात. तीन चाकींसाठींची रक्कम धरून सुमारे १ हजार कोटींची कमाई राज्य शासनाला होणार आहे.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community