भारत सरकारने मंगळवारी २८ मार्चला बनावट आणि निकृष्ट दर्जाची औषधे बनवल्याबद्दल १८ फार्मा कंपन्यांचे परवाने रद्द करत मोठी कारवाई केली आहे. या कंपन्यांना उत्पादन थांबवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाने अनेक औषध कंपन्यांची तपासणी केली होती. त्यानंतर या फार्मा कंपन्यांवर कारवाईचा हा आदेश दिला आहे.
माहितीनुसार, २० राज्यांमध्ये केंद्र आणि राज्याच्या पथकांनी अचानक तपासणी केली आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली. दरम्यान देशभरात बनावट औषधांच्या निर्मितीशी संबंधित फार्मा कंपन्यांवर कठोर कारवाई सुरू आहे. सुमारे पंधरा दिवस ही मोहीम सुरू आहे.
कोणत्या राज्यांमध्ये कारवाई केली
हिमाचल प्रदेशातील ७०, उत्तराखंडमधील ४५ आणि मध्य प्रदेशातील २३ कंपन्यांवर कारवाई करण्यात आली आहे. अनेक देशांतून भारतीय औषधांमुळे होणारे मृत्यू आणि आजारांच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर हे छापे टाकण्यात आले. मागील महिन्यात, गुजरातमधीस फार्मा कंपनी झायडस लाईफसायन्सने अमेरिकन बाजारातून गाउटवर उपचार करण्यासाठी वापरल्या जाणार्या जेनेरिक औषधाच्या ५५ हजारहून अधिक बाटल्या परत मागवल्या. औषधे अशुद्धता वैशिष्ट्यात अयशस्वी ठरले होते. याशिवाय, गेल्यावर्षी उझबेकिस्तानमध्ये कफ सिरपमुळे कथित १८ मुलांचा मृत्यू झाल्यानंतर नोएडा येथील एका फार्मास्युटिकल फर्मच्या तीन कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली होती. त्याच्यावर भेसळयुक्त औषध बनवून विकल्याचा आरोप होता.
(हेही वाचा – १ मेपासून Unwanted Call पासून होणार सुटका; सरकारने मोबाईल कंपन्यांना दिला मोठा आदेश)
Join Our WhatsApp Community