Andheri Sports Complex : अंधेरी क्रीडा संकुलातील हॉस्टेलमधील १८ खोल्या केल्या सिल, कारण…

3987
Andheri Sports Complex : अंधेरी क्रीडा संकुलातील हॉस्टेलमधील १८ खोल्या केल्या सिल, कारण…
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

अंधेरी पश्चिम येथील शहाजीराजे क्रीडा संकुलातील हॉस्टेलच्या जागेच्या भाडेकराराचा भंग आणि त्यातच वीज आणि पाण्याचे पैसे थकवल्याने येथील १८ खोल्यांना बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्यावतीने सिल ठोकण्यात आले आहे. याठिकाणी २२ खोल्या असून त्यातील चार खोल्या वगळता सोमवारी महापालिकेच्या मदतीने सील ठोकण्याची कारवाई केल्याची माहिती मिळत आहे. (Andheri Sports Complex)

(हेही वाचा – कर्नाटक सरकारच्या मराठी भाषिकांवरील दडपशाहीचा धिक्कार; DCM Eknath Shinde यांची तीव्र प्रतिक्रिया)

अंधेरी पश्चिम येथील शहाजीराजे क्रीडा संकुलात हॉस्टेल इमारतीतील २२ सदनिका प्रतिष्ठानच्यावतीने युनायटेड मार्केटींग अँड रिसर्च ब्युरो या संस्थेला भाडेकरारावर देण्यात आले होते. परंतु या सर्व खोल्यांचे भाडे,विजेच्या देयकांचे पैसे न भरल्याने प्रतिष्ठानच्यावतीने ९ डिसेंबर २०२४ रोजी येथील इमारतीत नोटीस जारी करण्यात आली आहे. याबाबतची नोटीस येथील हॉस्टेलमध्ये चिकटवण्यात आली आहे. त्यामुळे या सर्व सदनिका रिकाम्या करून घेण्याची कार्यवाही प्रतिष्ठानच्यावतीने महापालिका प्रशासनाच्यावतीने करण्यात आली आहे. महापालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, याठिकाणी युनायटेड मार्केटींग अँड रिसर्च ब्युरो या संस्थेसोबत भाडेकरार झाला असल तरी प्रत्यक्षात या संस्थेने अन्य संस्थेला या खोल्या वापराकरता दिल्याची बाब समोर आल्याने प्रतिष्ठानच्यावतीने ही कारवाई झाल्याची माहिती मिळत आहे. (Andheri Sports Complex)

(हेही वाचा – कर्नाटकातील काँग्रेस सरकार विधानसभा सभागृहातून काढणार Veer Savarkar यांची प्रतिमा; भाजपाकडून निषेध)

बृहन्मुंबई क्रीडा आणि ललितकला प्रतिष्ठानच्या अखत्यारित अंधेरीतील शहाजी राजे क्रीडा संकुल असून या प्रतिष्ठानचे विशेष कार्य अधिकारी सुनील गोडसे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी याला दुजोरा दिला असून याठिकाणी हॉस्टेलमध्ये २२ खोल्या असून त्यातील १८ खोल्या करण्यात आल्याचे त्यांनी म्हटले आहे. प्रतिष्ठानच्या दप्तरी नोंद असलेल्य युनायटेड मार्केटिंग कंपनीने या खोल्यांचे भाडे आणि वीजेच्या बिलासह अन्य रक्कम न भरल्याने या वर्गखोल्या रिकाम्या करून घेण्याच्या दृष्टीकोनात या खोल्या सिल करण्यात आले आहे. उर्वरीत खोल्यांमधील कुणी नसल्याने त्यांची सिल करण्याची प्रक्रिया पूर्ण झाली नसली तरी दुसऱ्यादिवशी ही कारवाई केली जाईल, असेही गोडसे यांनी स्पष्ट केले. (Andheri Sports Complex)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.