विसर्जनासाठी दोन्ही मार्गावर १८ विशेष लोकल गाड्या

गणपती विसर्जनासाठी होणारी अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन रेल्वेने विशेष गाड्यांचे नियोजन केले आहे. गणरायांच्या विसर्जन मिरवणुकीसाठी होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेने शुक्रवारी सायंकाळी गर्दीच्या वेळेत जलद लोकलला चर्चगेट ते मुंबई सेंट्रल दरम्यान थांबा देण्याचा निर्णय घेतला आहे. गणपती स्पेशल गाड्या चालविण्यात येणार असून त्यामुळे अनंत चतुर्दशीला गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी चौपाट्यांवर जाणाऱ्या भक्तांची सोय होणार आहे.

( हेही वाचा : “गणपती बाप्पा मोरया…पुढच्या वर्षी लवकर या” मुंबईतील भव्य मिरवणूकांची क्षणचित्रे)

मध्य रेल्वेच्या १० विशेष गाड्या

 • सीएसएमटी ते कल्याण
  रात्री १२.०८, पहाटे ३.२५
 • सीएसएमटी ते ठाणे
  रात्री १.००, रात्री २.००
 • कल्याण ते सीएसएमटी
  रात्री १.४०
 • ठाणे ते सीएसएमटी
  रात्री २.३०
 • सीएसएमटी ते पनवेल
  रात्री १.३०, रात्री २.४५
 • पनवेल ते सीएसएमटी
  रात्री १.००, रात्री १.४५

पश्चिम रेल्वे मार्गावर ८ विशेष गाड्या

 • चर्चगेट ते विरार – मध्यरात्री १.१५
 • चर्चगेट ते विरार- मध्यरात्री १.५५
 • चर्चगेट ते विरार – मध्यरात्री २.२५
 • चर्चगेट ते विरार – मध्यरात्री ३.२०
 • विरार ते चर्चगेट – रात्री १२.१५
 • विरार ते चर्चगेट – रात्री १२.४५
 • विरार ते चर्चगेट – रात्री १.४०
 • विरार ते चर्चगेट – रात्री ३.००

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here