प्रवाशांसाठी खुशखबर! रेल्वे सोडणार १८२ उन्हाळी विशेष गाड्या

139

उन्हाळ्यात अनेकजण गावी जातात, तसेच या कालावधीमध्ये शाळांनाही सुट्ट्या असतात याच पार्श्वभूमीवर प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १८२ उन्हाळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

( हेही वाचा : एसटीचा संप १ एप्रिलला मिटणार? पवारांचा फॉर्म्युला ठरणार निर्णायक )

१. मुंबई – बलिया त्रै-साप्ताहिक विशेष (७८ फेऱ्या)

  • 01025 ही विशेष गाडी १ एप्रिल ते २९ जून २०२२ पर्यंत दर सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १४.१५ वाजता सुटेल आणि बलिया येथे तिसऱ्या दिवशी ०१.४५ वाजता पोहोचेल.
  • 01026 ही विशेष गाडी १ एप्रिल ते १ जुलै २०२२ पर्यंत दर बुधवार, शुक्रवार आणि रविवारी बलिया येथून १५.१५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०३.३५ वाजता पोहोचेल.

गाडीचे थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, महाराज छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ग्यानपूर, वाराणसी, औंडिहार, मऊ आणि रसडा

२. मुंबई – गोरखपूर आठवड्यातून ४ वेळा विशेष (१०४ फेऱ्या)

  • 01027 ही विशेष गाडी (आठवड्यातून ४ वेळा) २ एप्रिल ते ३० जून २०२२ पर्यंत दर मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून १४.१५ वाजता सुटेल आणि गोरखपूर येथे तिसऱ्या दिवशी ०२.४५ वाजता पोहोचेल.
  • 01028 ही विशेष गाडी (आठवड्यातून ४ वेळा) ४ एप्रिल ते २ जुलै २०२२ पर्यंत दर सोमवार, मंगळवार, गुरुवार आणि शनिवारी गोरखपूर येथून १४.२५ वाजता सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ०३.३५ वाजता पोहोचेल.

गाडीचे थांबे : कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, हरदा, इटारसी, राणी कमलापती, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, महाराज छत्रसाल स्टेशन छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकुटधाम कारवी, माणिकपूर, प्रयागराज, ग्यानपूर, वाराणसी रोड, मऊ, भटनी आणि देवरिया सदर

गाडीची संरचना: एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, आणि गार्ड ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी डबे.

आरक्षण सुविधा

या गाड्यांची बुकिंग २७ मार्च २०२२ पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.