RTE : यंदाच्या वर्षी आरटीईच्या १९ हजार ३९४ जागा राहिल्या रिक्त

124

शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत (आरटीई) खासगी शाळांतील २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रियेत यंदा १९ हजार ३९४ जागा रिक्त राहिल्या आहेत. प्रवेश प्रक्रियेद्वारे नियमित प्रवेश जाहीर झालेले विद्यार्थी आणि प्रतीक्षा यादीतील विद्यार्थी अशा एकूण ८२ हजार ४५३ विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केला.

प्राथमिक शिक्षण संचालनालयातर्फे आरटीई प्रवेश प्रक्रिया राबवण्यात येते. यंदा ८ हजार ८२३ शाळांतील १ लाख १ हजार ८४६ जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत. त्यासाठी एकूण ३ लाख ६४ हजार ४१३ अर्ज दाखल झाले. प्रवेशासाठीच्या सोडतीतून ९४ हजार ७०० नियमित प्रवेश जाहीर करण्यात आला. नियमित विद्यार्थ्यांचे प्रवेश पूर्ण झाल्यानंतर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी तीन फेऱ्या राबवण्यात आल्या. त्यात पहिल्या फेरीत १३ हजार ६६०, दुसऱ्या फेरीत ३ हजार ५८३, तिसऱ्या फेरीत एक हजार २५९ आणि चौथ्या फेरीत १८ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला. त्यामुळे एकूण उपलब्ध जागांपैकी १९ हजार ३९४ जागा रिक्त राहिल्याचे संकेतस्थळावरील आकडेवारीवरून दिसून येत आहे.

(हेही वाचा Terrorist : पुण्यात बॉम्ब बनवण्याचे प्रशिक्षण शिबीर; ‘आयसिस’चा अड्डा उद्ध्वस्त)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.