मुंबई सुशोभिकरण अंतर्गत वडाळा, माटुंगा आदी भागातील पदपथांची सुधारणा तसेच सुशोभिकरणाची कामे हाती घेण्यात आली आहे. चार मुख्य रस्त्यांच्या पदपथांची सुधारणा करत सुशोभिकरण केले जात असून चार रस्त्यांच्या पदपथाच्या सुधारणेसाठी सुमारे २ कोटी रुपये खर्च केले जात आहे.
वडाळा, माटुंगा या एफ उत्तर विभागातील नाथालाल पारेख मार्ग, भांडारकर मार्ग, विद्यालंकार कॉलेज मार्ग, मेजर आर परमेश्वरम आदी चार मार्गाच्या पदपथावरील जुने पेव्हर ब्लॉक, टाईल्स काढणे, पादचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी आवश्यक ठिकाणी स्टील बोलार्ड लावणे, पृष्ठभाग समतल करण त्यावर एम २० ग्रेडचे सिमेंट काँक्रिट करणे तसेच त्यावर स्टेन्सिल पॅटर्नचा पृष्ठभाग तयार करणे, कर्ब स्टोनचे बांधकाम करणे आदी प्रकारच्या कामांसाठी महापालिकेने मागवलेल्या निविदेमध्ये पात्र कंत्राटदाराची निवड केली आहे. यासा विकाश एंटरप्रायझेस या कंपनीची निवड करण्यात आली आहे. यासाठी २ कोटी १२ लाख रुपये खर्च केला जात आहे. यातील नाथालाल पारेख मार्ग, विद्यालंकार कॉलेज मार्ग आदी रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे. सध्या भांडारकर मार्ग आणि मेजर आर परमेश्वर मार्गाच्या पदपथांच्या सुधारणेचे काम सुरू असून लवकरच तेही पूर्ण होईल असा विश्वास महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. विशेष म्हणजे चार रस्त्यांच्या पदपथांसाठी सरासरी ५० लाखांचा खर्च करण्यात येत आहे.
‘या’ रस्त्याचे पदपथ होणार सुशोभित
- नाथालाल पारेख मार्ग
- भांडारकर मार्ग
- विद्यालंकार कॉलेज मार्ग
- मेजर आर परमेश्वर मार्ग
(हेही वाचा – कुर्ला परिसरातील सात पादचारी पुलांची होणार पुनर्बांधणी)
Join Our WhatsApp Community