मुलुंडमध्ये घराचा स्लॅब कोसळून २ जण ठार

मुलुंड येथे सोमवारी, १५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७.४९ वाजता अचानक घराचा स्लॅब कोसळला. या दुर्घटनेत २ वृद्धांचा मृत्यू झाला.

इमारत धोकादायक होती 

मुलुंड पूर्व येथील मोती छाया बिल्डिंगमधील एका घराचे छत कोसळले, हे घर पहिल्या माळ्यावर आहे. या घटनेनंतर घरात यांनी अग्निशमन दलाला कळवले. ही इमारत २ माळ्याची आहे. खासगी मालकीची ही इमारत आहे, २०-२५ वर्षे ही इमारत जुनी आहे. ही इमारत जुनी असल्यामुळे महापालिकेने ३५१ नोटीस दिल्या. या घटनेत देवशंकर शुक्ला (९३) आणि आर्खीबेन देवशंकर शुक्ला (८७) या दोघांचा मृत्यू झाला.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here