मुरुडमध्ये काशिद समुद्र किनाऱ्यावर ५ विद्यार्थी बुडाले; दोघांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड येथील साने गुरुजी विद्यालयाचे पाच विद्यार्थी रायगड जिल्ह्यातील काशिद समुद्र किनाऱ्यावर बुडाल्याची घटना घडली. यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला असून तिघांना वाचवण्यात यश आले आहे.

७० विद्यार्थी आले होते सहलीला 

साने गुरुजी विद्यालयाचे ७० विद्यार्थी आणि पाच शिक्षक सोमवारी, ९ जानेवारी रोजी सहलीसाठी रायग़ड जिल्ह्यात आले होते. दुपारी बारा वाजता हे सर्व विद्यार्थी मुरुड तालुक्यातील काशिद समुद्र किनाऱ्याकडे आले. त्याठिकाणी समुद्र किनाऱ्याचा आनंद घेताना त्यांना समुद्राच्या पाण्यातील खोलीचा अंदाज आला नाही. त्यामुळे हे पाचही विद्यार्थी बुडाले. यापैकी स्थानिक बचाव पथकांनी तिघांना वाचविण्यात यश आले. उर्वरित दोघे बेपत्ता होते. त्यांचा शोध सुरु होता. अखेर दोघांचा मृतदेह तपास पथकाला आढळून आले. प्रणव कदम आणि रोहन बडवाल अशी दुर्घटनेत बुडालेल्या विद्यार्थ्यांची नावे आहेत. बचावलेल्या विद्यार्थ्यांवर अलिबाग जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या दुर्घटनेनंतर शैक्षणिक सहलीतील विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here