राज्यातील रोजगार हमी योजनेतील (Rojgar Hami Yojana) मजुरांच्या बँक खात्यामध्ये सन 2024- 25 मध्ये 2 हजार 856.30 कोटी रुपयांचा निधी जमा करण्यात आल्याची माहिती रोजगार हमी योजना विभागाकडून देण्यात आली आहे.
(हेही वाचा – Debris : ठाकरेंच्या मंजुरीने राबवलेल्या निविदेतील प्रकल्प कामाला उबाठाच्या माजी नगरसेवकांचा विरोध)
या योजनेंतर्गत 100 दिवसांपर्यंतची मजुरी केंद्र शासनाकडून प्राप्त होणाऱ्या निधीमधून दिली जाते. तर 100 दिवसांच्या वरील मजुरी राज्य शासनाच्या निधीतून दिली जाते. त्यानुसार सन 2024-25 मध्ये 100 दिवसांपर्यंत मजुरीचे 2 हजार 616.30 कोटी निधी आणि 100 दिवसांवरील मजुरीचे 240 कोटी रुपये असा एकूण 2 हजार 856.30 कोटी निधी मजुरांच्या बँक खात्यात थेट जमा करण्यात आला आहे. (Rojgar Hami Yojana)
(हेही वाचा – Debris : मुंबईतील राडारोड्याचा असाही वापर; महापालिकेने यापासून केली वाळूची निर्मिती)
केंद्र व राज्य शासनाकडून सन 2024-25 मध्ये अनुक्रमे 66.21 कोटी व 5.88 कोटी रुपये असा एकूण 72.09 कोटी इतका निधी मजुरीपोटी पालघर जिल्ह्यातील मजुरांच्या खात्यात जमा करण्यात आला असल्याची महितीही ‘रोहयो’ विभागाने दिली आहे. (Rojgar Hami Yojana)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community