एसटी महामंडळाकडून कोकणात २ हजार जादा चालक; कशेडी घाटात विशेष दक्षता

129

गेल्या दोन वर्षांनंतर गणेशोत्सव साजरा होणार आहे. त्यामुळे एसटीच्या नियमित बसगाड्यांबरोबरच अतिरिक्त बसगाड्यांचे आरक्षण सुद्धा मोठ्या प्रमाणात करण्यात आले आहे. मराठवाडा, खान्देश, विदर्भ या भागातील दोन हजार एसटी चालक कोकणासाठी रवाना होणाऱ्या एसटी गाड्यांच्या वाहतुकीची धुरा सांभाळणार आहेत.

( हेही वाचा : ट्रेनच्या शेवटच्या कोचवर ‘X’ आणि ‘LV’ अशी चिन्हे का असतात? याचा नेमका अर्थ काय जाणून घ्या…)

राज्यातील गाड्या कोकणासाठी रवाना 

मुंबई, ठाणे, बोरीवली, पालघर या भागातून जवळपास अडीच हजार अतिरिक्त गाड्या सोडण्याची घोषणा एसटी महामंडळाने केली आहे. आतापर्यंत एसटीच्या नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव येथून ५७५ गाड्या, पुणे विभागातून ७२५, औरंगाबाद विभागातून ६५० गाड्या कोकणासाठी रवाना केल्या आहेत. या गाड्यांसोबत प्रत्येक एक चालक असे दोन हजार चालक एसटीच्या जादा गाड्यांच्या वाहतुकीची जबाबदारी सांभाळणार आहेत.

सुरक्षितरित्या गाड्या चालवण्याच्या सूचना 

मुंबई-गोवा महामार्गावरील विशेषत: कशेडी घाटात वाहन सुरक्षित चालवावे अशा सूचना एसटी महामंडळाकडून चालकांना देण्यात आल्या आहेत. तसेच चालकाने मद्यपान केल्याचे आढळल्यास त्या चालकाला निलंबित करण्यात येणार आहे. यासाठी एसटी महामंडळाकडून मार्ग तपासणी व गस्ती पथकही तैनात करण्यात आले आहे. कोकणातील रस्ते घाट राज्यातील इतर चालकांना नवे असल्याने त्यांना बस सुरक्षितरित्या चालवण्याच्या सूचना दिल्या जात आहेत.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.