ठाण्यात दोन कामगारांचा मृत्यू

106

इमारतचे काम सुरु असलेल्या एका कन्स्ट्रक्शनच्या पाय खोदण्याचे काम सुरु असताना मातीचा काही भाग खचून त्या ढिगाऱ्याखाली तीन कामगार अडकले असून त्यातील दोन कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना ठाण्यातील नौपाडा परिसरात घडली आहे. तर तिसरा कामगार हा गंभीर जखमी असून त्याच्यावर ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

ठाण्यातील नौपाडा बी कॅबिन परिसरातील स्वाद हॉटेल जवळ सत्यनिलम या सोसायटीच्या पुनर्विकासाचे काम सुरू आहे. या ठिकाणी जेसीबीच्या सहाय्याने सोसायटीच्या पाया खोदण्याचे काम सुरु होते. त्यासाठी मातीचे ढिगारे बाजूला काढत असतानाच मातीचा भला मोठा ढिगारा अचानक खचला. या घटनेत ढिगाऱ्याखाली ३ कामगार अडकले. स्थानिकांनी या घटनेची माहिती तात्काळ ठाणे आपत्ती व्यवस्थापन आणि अग्निशमन विभागाला देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन उप-आयुक्त जी. जी.गोदेपुरे, उप-आयुक्त शंकर पाटोळे, नौपाडा प्रभाग समिती सहा. आयुक्त अजय एडके, मुख्य अग्निशमन अधिकारी, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, ठाणे आपत्ती प्रतिसाद दलाचे जवान, अग्निशमन दलाचे जवान व आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी, अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व नौपाडा पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेत ढिगारा हटवण्याच्या कामाला सुरुवात केली. काही वेळातच ढिगारा बाजूला करून अडकलेल्या तिघांना बाहेर काढले. मात्र यावेळी ढिगाऱ्याखाली अडकलेल्या तीन कामगारांपैकी २ कामगारांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर एका कामगाराच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरु आहेत. हबीब बाबू शेख (४२) आणि रणजित असे मृत्यू झालेल्या दोन कामगारांची नावे असून निर्मल रामलाल राब (४९) असे गंभीर जखमी झालेल्या कामगारांचे नाव आहे.

(हेही वाचा मोदींना हरवण्यासाठी मेलेल्या मुस्लिमांना आणा; राष्ट्रवादीच्या व्यासपीठावरील आवाहनाचा फडणवीसांकडून समाचार )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.