राज्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंची हानी करणार्यांवर कठोर कारवाई करण्याचा महत्त्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ४ ऑक्टोबर या दिवशी झालेल्या मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंची हानी केल्यास यापुढे २ वर्षांचा कारावास (Jail) अन् १ लाख रुपये इतका दंड ठोठावण्यात येणार आहे. राज्यातील प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंचे पावित्र भंग करण्याचे प्रकार रोखण्यासाठी राज्यशासनाने हा निर्णय घेतला आहे. या मंत्रीमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांसह अन्य मंत्री उपस्थित होते.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता येत्या काही दिवसांत घोषित होण्याची शक्यता आहे. या अनुषंगाने मंत्रीमंडळाच्या बैठकीत तब्बल ४१ निर्णय घेण्यात आले. यामध्ये अनेक महत्त्वाच्या निर्णयांचा समावेश आहे. महाराष्ट्र प्राचीन स्मारके आणि पुराणवास्तूशास्त्रविषयक स्थळे अन् अवशेष नियम १९६० (१९६१ चा महाराष्ट्र अधिनियम क्र.१२) मधील प्रावधानानुसार यापूर्वी प्राचीन आणि ऐतिहासिक वास्तूंची हानी करणार्यांना ३ महिने कारावास (Jail) किंवा ५ सहस्र रुपये दंड किंवा दोन्ही अशी किरकोळ शिक्षा होती. वर्ष १९६० पासून या शिक्षेमध्ये कोणत्याही प्रकारे वाढ करण्यात आलेली नव्हती. हे लक्षात घेऊन राज्यशासनाने या शिक्षेत वाढ केली आहे.
गड-दुर्ग यांवर अतिक्रमण करणार्यांवरही शिक्षा होऊ शकते
Join Our WhatsApp Community