प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वे नागपूर आणि मडगाव दरम्यान २० अतिरिक्त विशेष गाड्या चालवणार आहे.
( हेही वाचा : WiFi चा वापर करण्यात मध्य रेल्वेचे हे स्थानक आघाडीवर! CSMT स्थानकालाही टाकले मागे)
नागपूर मडगाव विशेष गाड्या
- 01139 ही विशेष गाडी दिनांक २७.७.२०२२ ते २८.९.२०२२ पर्यंत प्रत्येक बुधवार आणि शनिवारी नागपूर येथून १५.०५ वाजता सुटेल आणि मडगाव येथे दुसऱ्या दिवशी १७.३० वाजता पोहोचेल.
- 01140 ही विशेष गाडी दिनांक २८.७.२०२२ ते २९.९.२०२२ पर्यंत दर गुरुवार आणि रविवारी मडगाव येथून १९.०० वाजता सुटेल आणि नागपूर येथे दुसऱ्या दिवशी २१.३० वाजता पोहोचेल.
थांबे : वर्धा, पुलगाव, धामणगाव, बडनेरा, अकोला, मलकापूर, भुसावळ, नाशिकरोड, इगतपुरी, कल्याण, पनवेल, रोहा, माणगांव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, अरावली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग, कुडाळ, सावंतवाडी रोड, थिवि, करमळी.
संरचना : एक द्वितीय वातानुकूलित, ४ तृतीय वातानुकूलित, ११ शयनयान, दोन गार्ड्स ब्रेक व्हॅनसह ६ सामान्य द्वितीय श्रेणी.
आरक्षण : विशेष ट्रेन क्र. 01139/01140 साठीचे बुकिंग विशेष शुल्कासह दि. १६.७.२०२२ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल.
तपशीलवार वेळा आणि थांब्यासाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. तसेच प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला रेल्वेने दिला आहे.
Join Our WhatsApp Community