मणिपूरमध्ये (Manipur) केंद्र सरकारने निमलष्करी दलाच्या 20 अतिरिक्त कंपन्या तैनात केल्या आहेत. यामध्ये सीआरपीएफच्या 15 आणि बीएसएफच्या 5 कंपन्यांचा समावेश आहे. राज्यात कुकी दहशतवाद्यांचा (Cookie Terrorists) वाढता उपद्रव पाहता केंद्र सरकारने हा निर्णय घेतला आहे.
(हेही वाचा – gulmohar plant : गुलमोहर झाडाचे वैशिष्ट्य तुम्हाला माहिती आहे का? मग हा लेख वाचा!)
कुकी दहशतवाद्यांनी 11 नोव्हेंबर रोजी जिरीबाममधील बोरोबेकरा येथील सीआरपीएफ कॅम्पवर हल्ला केला होता. यावेळी सीआरपीएफच्या जवानांनी जोरदार प्रत्युत्तर देत 11 दहशतवाद्यांना कंठस्नान घातले. त्यानंतर कुकी दहशतवाद्यांनी पळ काढला होता. परंतु, या कारवाईनंतर राज्यात तणावाचे वातावरण आहे.
त्यामुळे केंद्र सरकारने मणिपूरमध्ये (Manipur) अतिरिक्त सुरक्षादल तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला. मणिपूर येथे मे 2023 मध्ये मैतेई-कुकी जमातींमध्ये संघर्ष उसळल्यानंतर राज्यात सीआरपीएफच्या 198 कंपन्या तैनात करण्यात आल्या होत्या. त्यानंतर राज्यात हळूहळू शांतता प्रस्थापित होत गेली. परंतु, जिरीबाममध्ये नव्याने उसळलेल्या हिंसाचारानंतर आता निमलष्करीदलाच्या 20 कंपन्या तैनात करण्यात आल्या असून या कंपन्या आगामी 30 नोव्हेंबरपर्यंत मणिपूर (Manipur) सरकारच्या अधीन काम करतील.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community