अमेरिकेसाठी धोक्याचा इशारा; २० टक्के ख्रिस्ती धर्मियांनी स्वीकारला Islam

यामध्ये उतारवयातील लोकांची संख्या अधिक आहे. या दोन्ही देशांत सध्या मुसलमान अल्पसंख्यांक आहेत.

131

जगभरात इस्लाम (Islam) वाढवण्यासाठी एका बाजूला इस्लामिक स्टेट सारख्या दहशतवादी संघटना कार्यरत आहेत, जे दशहतवादाच्या माध्यमातून छोटे छोटे देश ताब्यात घेत आहेत, दुसरीकडे लव्ह जिहाद, लँड जिहादच्या माध्यमातून भारतासारख्या देशात इस्लाम (Islam) वाढवण्याचा प्रयत्न धर्मांध मुसलमान करत असतात, तसे अमेरिकेत लोकसंख्या जिहाद सुरु केला आहे. अमेरिकेत आजवर २० टक्के ख्रिस्ती नागरिकांनी इस्लाम धर्म स्वीकारल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

अमेरिकेतील ‘प्यू रिसर्च सेंटर’ने ३६ देशांमध्ये केलेल्या सर्वेक्षणानुसार अमेरिकेतील २० टक्के आणि केनियातील ११ टक्के लोकांनी इस्लाम (Islam) स्वीकारला आहे. इस्लाम स्वीकारणारे या दोन्ही देशांतील लोक हे अगोदर ख्रिस्ती होते. यामध्ये उतारवयातील लोकांची संख्या अधिक आहे. या दोन्ही देशांत सध्या मुसलमान अल्पसंख्यांक आहेत. या ३६ देशांमध्ये भारताचा समावेश आहे कि नाही?, हे समजू शकलेले नाही.

(हेही वाचा Waqf Bill : शिवसेना उबाठाची पळापळ!)

या सर्वेक्षणात एकूण ३६ देशांपैकी १३ देशांमध्येच योग्य नमुने गोळा करता आले. यामध्ये इस्लाम स्वीकारणारे आणि इस्लाम (Islam) सोडणारे, अशा दोघांचाही तुलनात्मक अभ्यास करण्यात आला. त्यांची सविस्तर माहिती नोंदवण्यात आली. या देशात आर्थिक प्रगत राष्ट्रांसह आफ्रिकी आणि इतर खंडांतील देशांचा समावेश होता. ज्या १३ देशांमध्ये या संस्थेला नमुने गोळा करता आले त्याठिकाणी इस्लाम सोडणार्‍यांचा अभ्यास करण्यात आला. हे लोक इस्लाम (Islam) सोडल्यावर इतर कोणताच धर्म स्वीकारत नसल्याचे समोर आले आहे. ते नास्तिक झाले आहे अथवा त्यांना कोणताच धर्म स्वीकारायचा नसल्याचे त्यांनी सांगितले. काही जणांनी इस्लाम सोडल्यावर ख्रिस्ती धर्माला जवळ केल्याचे समोर आले आहे.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.