Beed मध्ये भेसळयुक्त दूध बनवण्यासाठी वापरण्यात येणारी २० हजार किलो पावडर जप्त

186

दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी अनधिकृतपणे वापरण्यात येणाऱ्या पावडरचा साठा एका गोडाऊनमध्ये असल्याची गोपनीय माहिती बीड प्रशासनाला मिळाली. त्यानंतर बीड (Beed) जिल्हाधिकाऱ्यांसह, अन्न औषध प्रशासन, पोलीस यांनी संयुक्तपणे दहा तास कारवाई करत १८ लाख ७२ हजार रूपयांची २० हजार ३१० किलो पावडर जप्त केली.

(हेही वाचा Bangladesh मध्ये पुन्हा भडकला हिंसाचार; ३२ जणांचा मृत्यू)

७०६ गोण्या जप्त केल्या 

कडा येथे रविवारी पहाटे ही कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे ही कारवाई १० तास चालली होती. आष्टी तालुक्यातील बीड (Beed) नगर राष्ट्रीय महामार्गावरील कडा येथील टाकळी अमिया फाट्याजवळ एका भाडोत्री पत्र्याच्या शेडमध्ये दुधाची गुणवत्ता वाढवण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या पावडरचा मोठा साठा असल्याची गोपनीय माहिती जिल्हाधिकाऱ्याना मिळाली होती. जिल्हाधिकाऱ्यासह, अन्न औषध प्रशासन व पोलिसांच्या पथकाने पहाटेच या ठिकाणी धाड टाकली. विक्रीसाठी साठा ठेवलेल्या अंबादास पांडुरंग चौधरी याला ताब्यात घेत त्याने साठा केलेल्या ठिकाणावरून १८ लाख ७२ हजार रूपये किंमतीची २० हजार ३१० किलो पावडरच्या ७०६ गोण्या जप्त करत त्याच्यावर कायदेशीर गुन्हा दाखल केला.

 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.