कोकणातील रघुवीर घाटात दरड कोसळल्याने २० गावांचा संपर्क तुटला

रत्नागिरी आणि सातारा या दोन जिल्ह्यांना रघुवीर घाट जोडतो. याच घाटात दरड कोसळल्याची घटना समोर आली आहे. दरड कोसळल्याने सातारा जिल्ह्यातील २० गावांचा संपर्क दीर्घ काळासाठी तुटला आहे. गेल्या १५ दिवसांतील दरळ कोसळण्याची ही तिसरी घटना आहे. या घाटामुळे वाहतूक पूर्णपणे बंद असून, पावसाळी वातावरणामुळे दरड हटवण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.

अतिवृष्टीने जनजीवन विस्कळित 

हवामान विभागाने पुढचे पाच दिवस सतर्कतेचा इशारा दिला आहे. हवामान विभागाने कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. तसेच नदीकाठच्या गावांना सावध राहण्याची सूचना देण्यात आली आहे.

( हेही वाचा : CWG 2022 : एकाच दिवसात सुवर्ण पदकांचा चौकार! कॉमनवेल्थ स्पर्धेत ऐतिहासिक कामगिरी)

दोन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात अनेक ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली आहे. लांजा तालुक्यात आंजणारी येथील दत्त मंदिर पुरामुळे पाण्याखाली गेले आहे. अतिवृष्टीमुळे काजळी नदीला पूर आल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. काजळी नदीने धोक्याची पातळी ओलांडली असून शास्त्री तसेच कोदवली आणि बावनदी इशारा पातळीच्या वर वाहत आहेत. रत्नागिरी तालुक्यातील शीळ येथे घरावर विजेचा खांब कोसळून घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

 

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here