धक्कादायक: 200 दशलक्ष ट्वीटर युजर्सचा डेटा चोरीला; ईमेल आयडी लीक

ट्वीटर युजर्ससाठी मोठी बातमी समोर आली आहे. ट्वीटर युजर्सचा डेटा चोरीला गेल्याची माहिती समोर आली आहे. एका रिपोर्टनुसार, हा दावा करण्यात आला आहे. सिक्योरिटी रिसर्चरच्या रिपोर्टनुसार, 200 दशलक्षहून अधिक ट्वीटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे. हॅकरने युजर्सचे ई-मेल आयडी चोरून ते एका ऑनलाइन फोरममध्ये पोस्ट केले आहेत. ब्रीच- नोटिफिकेश साइट हॅव आय बीन प्वेन्डचे निर्माते ट्राॅय हंट यांच्या माहितीनुसार, 200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा ईमेल आयडी चोरीला गेला आहे.

200 दशलक्ष ट्विटर युजर्सचा डेटा चोरीला

इस्त्रायली सायबर सिक्युरिटी- माॅनिटरिंग फर्म हडसन राॅकचे सह- संस्थापक एलाॅन गॅल यांनी लिंक्डइन पोस्ट करत म्हटले आहे की, फार मोठ्या प्रमाणात माहिती चोरीला गेली आहे. दुर्दैवाने या घटनेमुळे बरेच हॅकिंग, टार्गेट फिशिंग आणि डाॅकिसंग या घटनांमध्ये वाढ होईल. गॅल यांनी 24 डिसेंबर रोजी सोशल मीडियावर ट्वीटर युजर्सचा डेटा लीक झाल्याबद्दल पोस्ट करत माहिती दिली होती. गॅल यांनी त्यावेळी सांगितले होते की, मोठ्या प्रमाणात ट्वीटर युजर्सची माहिती चोरीला जात आहे. ट्वीटरने या समस्येची चौकशी किंवा समस्या सोडवण्यासाठी काय कारवाई केली आहे. याबाबत स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here