सलग दुस-या दिवशीही २० हजार नवीन कोरोनाबाधित रुग्ण

82

कोविड बाधित रुग्णांची संख्या सलग दुसऱ्या दिवशी पाच हजारांनी वाढल्यानंतर शुक्रवारी रुग्णांची संख्या गुरुवारपर्यंत २० हजारांपर्यंतच स्थिरावली. गुरुवारी जिथे २० हजार १८१ रुग्ण आढळून आले होते, तिथे शुक्रवारी सुमारे ८०० रुग्णांची भर पडत २० हजार ९७१ एवढे रुग्ण आढळून आले आहेत. या रुग्णांपैकी १,३९५ रुग्णांना रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. यापैकी ८८ रुग्णांना ऑक्सिजन बेडची आवश्यकता भासली गेली आहे. विशेष म्हणजे दिवसभरात साडेआठ हजार रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर मृतांचा आकडा वाढलेला पहायला मिळत असून दिवसभरात ६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये पाच रुग्ण हे दीर्घकालिन आजारी होते.

गुरुवारी ६७ हजार ४८७ चाचणी केल्यानंतर २० हजार १८१ रुग्ण आढळून आले होते, तिथे शुक्रवारी ७२ हजार ४४२ चाचण्या करण्यात आल्यानंतर २० हजार ९७१ नवीन रुग्ण आढळून आले होते. विशेष म्हणजे दिवसभरात ८ हजार ४९० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मुंबईतील विविध कोविड सेंटर आणि रुग्णालयांमध्ये ६ हजार ५३१ रुग्ण उपचार घेत असून सक्रिय रुग्णांची संख्या ९१ हजार ७३० एवढी आहे. तर रुग्ण दुपटीचा दर हा ५६ दिवस एवढा होता.

( हेही वाचा : बायोमेट्रीक हजेरीच्या स्थगितीचा निर्णय ‘आरोग्या’ने बिघडवला! )

बुधवारी झोपडपट्यांमधील कंटेन्मेंट झोनची संख्या ही २० एवढी होती, तर गुरुवारी ही संख्या ३२ एवढी होती, पण शुक्रवारी ही संख्या ०६ एवढी आहे. तर सीलबंद इमारतींच्या संख्येतही झपाट्याने वाढ होत ४६२ वरून ५०२ एवढी झाली होती, ही संख्या शुक्रवारी १२३ एवढी झाली.

दिवसभरातील रुग्ण संख्या

एकूण बाधित रुग्ण : २० हजार ९७१
बाधित पैकी लक्षणे नसलेल्या रुग्णांची संख्या: १७ हजार ६१६ (८४ टक्के)
गुरुवारी रुग्णालयात दाखल झालेले रुग्ण : १ हजार ३९५

दाखल रुग्णांपैकी ऑक्सिजन बेडवरील रुग्ण संख्या : ८८

एकूण दाखल रुग्ण : ६ हजार ५३१
एकूण सक्रिय रुग्णांची संख्या : ९१ हजार ७३१

एकूण उपलब्ध रुग्ण खाटा :३५ हजार ६४५

रुग्ण दाखल असलेल्या खाटांची टक्केवारी : १८.३टक्के

बरे झालेले रुग्ण : ८ हजार ४९०
दिवसभरातील मृत रुग्णाची संख्या : ०६

दिवसभरात केलेल्या कोविड चाचण्या : ७२ हजार ४४२
कंटेन्मेंट झोपडपट्टी: ०६
सीलबंद इमारती : १२३

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.