President Draupadi Murmu : भारताला सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र बनवणे हे अधिकाऱ्यांचे सामूहिक ध्येय – राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू

हे सर्व अधिकारी सध्या विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत.

105
Kanchanjunga Train: पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताविषयी राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या भावना, 'X'वर पोस्ट करत म्हणाल्या...
Kanchanjunga Train: पश्चिम बंगालमधील रेल्वे अपघाताविषयी राष्ट्रपतींनी व्यक्त केल्या भावना, 'X'वर पोस्ट करत म्हणाल्या...

भारताला सर्वसमावेशक आणि विकसित राष्ट्र बनवणे अधिकाऱ्यांचे सामूहिक ध्येय आहे. असे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू (President Draupadi Murmu) यांनी भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०२१ च्या तुकडीतील अधिकाऱ्यांची भेट घेतली यावेळी त्यांच्याशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की आपल्याबरोबरच्या तरुणांना विविध क्षेत्रातील त्यांच्या क्षमता ओळखायला मदत करुन हे अधिकारी मोठे योगदान देऊ शकतात. भारतीय प्रशासकीय सेवेच्या २०२१ च्या तुकडीतील १८२अधिकार्‍यांच्या गटाने, सोमवारी (२५ सप्टेंबर २०२३) राष्ट्रपती भवनातील सांस्कृतिक केंद्रात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेतली. हे सर्व अधिकारी सध्या विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमध्ये सहाय्यक सचिव म्हणून कार्यरत आहेत. (President Draupadi Murmu)

या अधिकार्‍यांना संबोधित करताना राष्ट्रपती म्हणाल्या की, या अधिकाऱ्यांची सेवा अधिकार, भूमिका आणि जबाबदारीच्या बाबतीत इतर कोणत्याही सेवेपेक्षा वेगळी आहे. ही सेवा नसून एक मिशन असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. देशाला आणि देशातील जनतेला सुशासनाच्या चौकटीत पुढे नेणे हे या अधिकाऱ्यांचे ध्येय आहे, असेही त्या म्हणाल्या. देशाची आणि पर्यायाने जनतेची सेवा करणे ही त्यांची नियती आहे, असे त्यांनी सांगितले. २०४७ च्या विकसित भारताच्या उभारणीत योगदान देण्याची मोठी संधी या अधिकाऱ्यांकडे आहे, हे अधिकारी आपली वचनबद्धता आणि सर्जनशीलतेद्वारे आपल्या देशाचा कायापालट करण्यासाठी प्रभावी कार्य करु शकतात, असे राष्ट्रपती म्हणाल्या. (President Draupadi Murmu)

(हेही वाचा : Boxing : ठाणे बॉक्सिंग असोसिएशनच्या स्पर्धेत महाराष्ट्र मिलिटरी स्कूलच्या विद्यार्थ्यांची ‘सुवर्ण’ कामगिरी)

ज्यांचे हृदय गरीब आणि वंचितांसाठी धडधडते तोच खरा नागरी सेवक असतो, कारण तो केवळ सरकारी नोकरशहा असलेल्या कर्मचाऱ्यांच्यापेक्षा पूर्ण वेगळा असतो, असे त्या म्हणाल्या. समाजातील उपेक्षित वर्गातील लोकांचे उत्थान करणे हेच नागरी सेवकांसाठीवाहन केले. ही लोककेंद्रित सतर्कता आणि संवेदनशीलता त्यांना फाइलींसंदर्भात योग्य काम करण्यासाठी प्रोत्साहित करेल असेही राष्ट्रपती म्हणाल्या.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.