Tigers : सन २०२५ हे वर्ष वाघांसाठी धोकादायक

41
Tigers : सन २०२५ हे वर्ष वाघांसाठी धोकादायक
  • विशेष प्रतिनिधी, मुंबई

मागील काही वर्षांपासून वाघांची (Tigers) संख्या कमी होऊ नये यासाठी वन विभाग प्रयत्नशील असले तरी प्रत्यक्षात १ जानेवारी ते २० फेब्रुवारी २०२५ या ५० दिवसांमध्येच तब्बल १५ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे. या कालावधीमध्ये नागपूर, चंद्रपुर यवतमाळ वनवृत्त तसेच पेंच व्याघ्र प्रकल्प व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत नैसर्गिक कारणामुळे ८ वाघ, रेल्वे अपघातात ३ वाघ आणि शिकारीमुळे ४ अशा एकूण १५ वाघांचा (Tigers) मृत्यू झाल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे सन २०२५ हे वाघांसाठी धोकादायक असल्याचे दिसून येत आहे.

राज्यात अन्य वन परिक्षेत्रात विशेषत: चंद्रपुर, बह्मपूरी, भंडारा, तुमसर, यवतमाळ, नागपूर, ताडोबा, गोंदिया, बल्लारशा, राजुरा आदी मोठ्याप्रमाणात वाघांचे (Tigers) मृत्यू झाल्याची बाब विधीमंडळात तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित झाली हाती. यामध्ये वनमंत्री गणेश नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, १ जानेवारी २०२५ ते २० फेब्रुवारी २०२५ या कालावधीमध्ये नागपूर, चंद्रपुर यवतमाळ वनवृत्त तसेच पेंच व्याघ्र प्रकल्प व ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पांतर्गत नैसर्गिक कारणामुळे ८ वाघ, रेल्वे अपघातात ३ वाघ आणि शिकारीमुळे ४ अशा एकूण १५ वाघांचा (Tigers) मृत्यू झाल्याची नोंद असल्याचे सांगितले. या वाघांच्या शिकारीच्या ४ प्रकरणांमध्ये एकूण १९ अरोपींना अटक करण्यात आली आहे. विद्युत प्रवाहामुळे वाघांचे व अन्य वन्य प्राण्यांचे मृत्यू होऊ नये म्हणून वनविभाग व म.रा.वि.वि. महामंडळ मिळून प्रतिबंधात्मक उपाय म्हणून क्षेत्रीय कर्मचाऱ्यांद्वारे सनियंत्रण करण्यात येत आहे.

(हेही वाचा – Dadar Hawkers : फेरीवाल्यांमध्ये गिरणी कामगार आणि त्यांचे कुटुंबीय किती?; दादरकरांचा सवाल)

जिल्हास्तरीय व्याघ्र समितीच्या बैठकीत वाघ बिबट इतर वन्यप्राण्यांच्या संरक्षणाच्या उपाययोजनांची आखणी करण्यात येते. प्रतिबंध शिकाऱ्यांची माहिती मिळण्याकरीता परिक्षेत्र स्तरावर खबऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून प्राप्त माहितीनुसार कार्यवाही करण्यात येते. त्यासाठी गुप्त सेवा निधीचा वापर करण्यात येतो. विशेष व्याघ्र (Tigers) संरक्षण दलातील पथकामार्फत अतिसंवेदनशील क्षेत्रात नियमित गस्त करण्यात येते. तसेच स्कॉड अंतर्गत सुद्धा गस्ती करून शिकारी हालचालीवर नियंत्रण ठेवण्यात येते. एम स्ट्रीप्स प्रणाली असले मोबाईलचा पुरवठा क्षेत्रिय कर्मचाऱ्यांना करण्यात आला असून त्याद्वारे संशयास्पद गतीविधींवर लक्ष ठेवण्यात येत आहे. जंगलात आवश्यक त्या ठिकाणी लक्ष केंद्रीत करण्यासाठी संरक्षण कुटी, निरीक्षण मनोरे व तपासणी नाके तैनात करण्यात आले आहेत.

मेळघाट व्याघ्र (Tigers) प्रकल्पात तयार करण्यात आलेल्या सायबर सेलच्या माध्यमातून शिकारीच्या घटनांमधील आरोपींचा शोध घेण्यात येतो. वन विभागातील अतिक्रमण, वन्यप्राण्यांची शिकार, वनवणवा इत्यादी गुन्ह्यांची माहिती प्राप्त होण्याकरीता १९२६ हा हेल्पलाईन क्रमांक कार्यान्वयीत करण्यात आला आहे.

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.