कोकण रेल्वेवर गणेशोत्सवात २०६ अतिरिक्त गाड्या

105

गणेशोत्सवाला कोकणात विशेष महत्त्व असल्यामुळे मुंबई, पुण्यातून चाकरमानीवर्ग मोठ्या प्रमाणात गणेशोत्सवासाठी गावची वाट धरतात. गणपतीला गावी जाणाऱ्या रेल्वेगाड्यांचे आरक्षण ४ महिने आधीच फुल्ल होत असल्यामुळे दरवर्षी कोकण रेल्वे मार्गावर गणपती विशेष गाड्यांचे आयोजन केले जाते. यंदाही गणेशोत्सवासाठी मुंबईतून कोकणात येण्यासाठी चाकरमान्यांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन कोकण रेल्वेवर मध्य आणि पश्चिम मिळून २०६ जादा गाड्या सोडण्यात आल्या आहेत. या गाड्या सर्व नियोजन करूनच सोडण्यात आल्याने त्याच्या वेळापत्रकाची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

कोकण रेल्वेवर गणेशोत्सवात २०६ अतिरिक्त गाड्या

मध्य रेल्वेने सुरुवातीला सर्वांत आधी ५ जुलै रोजी ७२ गणपती स्पेशल ट्रेन सोडल्या होत्या. सीएसएमटी-सावंतवाडी रोड, पनवेल-कुडाळ-थिवी या मार्गावरच्या या गाड्या होत्या. त्याचे बुकिंग ८ जुलैला सुरू होताच फुल झाले. त्यानंतर १६ जुलै रोजी मध्य रेल्वेने सीएसएमटी ते मंगळुरू अशा ८ एसी स्पेशल गाड्या सोडल्या. पश्चिम रेल्वेनेही मुंबई सेंट्रल, वांद्रे टर्मिनस आणि उधना आणि विश्वामित्री येथून मडगाव व कर्नाटकच्या ठोकूर अशा गणपती उत्सवाच्या ६० फेऱ्या सोडल्या. मध्य रेल्वेने रोहा ते चिपळूण अशा ३२ गणपती स्पेशल मेमू ट्रेन सोडल्याने मध्य रेल्वेच्या एकूण गाड्यांची संख्या २०६ झाली.

( हेही वाचा : Indian Passport : भारतीय नागरिक ‘या’ ६० देशांमध्ये करू शकतात व्हिसामुक्त प्रवास! ‘हे’ आहेत जगातील पॉवरफुल पासपोर्ट असलेले देश)

या विशेष गाड्यांच्या थांब्यांच्या तपशीलवार वेळेसाठी कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा तसेच प्रवाशांनी स्वत:च्या आणि इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड योग्य वर्तन पाळण्याचा सल्ला रेल्वेकडून दिला जात आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.