मालाडमध्ये २१ मजली इमारतीला आग; जीवितहानी नाही

98

मुंबईतील मालाडमधील जनकल्याण नगर येथील एका २१ मजली इमारतीला आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या ८ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळाले आहे. ही आग तिस-या मजल्यावर लागल्याचे सांगण्यात येत आहे. यात कोणीही जखमी झाल्याचे वृत्त नाही. या घटनेचा व्हिडीओ सोशल मिडीयावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. त्यात एक जण बाल्कनीतून खाली येण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसत आहे.

( हेही वाचा: तिने तिचा ‘तो’ हट्ट सोडला नाही; शेवटी …” लोकलमध्ये चढलेल्या महिलेचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल )

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.