कानपूरजवळ Sabarmati Express चे २२ डबे घसरले; घातपाताचा संशय

116
कानपूरजवळ Sabarmati Express चे २२ डबे घसरले; घातपाताचा संशय
कानपूरजवळ Sabarmati Express चे २२ डबे घसरले; घातपाताचा संशय

गेल्या काही महिन्यांत रेल्वे अपघाताच्या घटना सातत्याने घडत आहेत. १७ ऑगस्ट रोजी उत्तर प्रदेशमधील कानपूर येथे रेल्वे अपघात झाला. वाराणसीहून अहमदाबादकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचे (Sabarmati Express) २२ डबे रुळावरून घसरले. या अपघाताबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. रेल्वे रुळावर मोठा दगड असल्याने हा घातपात घडला आहे.

(हेही वाचा – Vasai तील कंपनीत घृणास्पद कृत्य; महिलांच्या पाण्याच्या बाटलीत टाकली लघवी)

रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी X पोस्टमध्ये म्हटले आहे की, वाराणसीहून अहमदाबादकडे जाणाऱ्या साबरमती एक्स्प्रेसचं इंजिन आज पहाटे २.३५ च्या सुमारास कानपूरजवळ रेल्वे रुळांवर ठेवलेल्या कुठल्या तरी वस्तूवर आदळलं. त्यानंतर इंजिनासह डबे रुळांवरून घसरले. या घटनेनंतर काही खुणा दिसून आल्या. काही खुणा १६ व्या डब्याजवळ आढळल्या आहेत. प्राथमिक तपासामध्ये रेल्वेच्या रुळांना कुठलेही नुकसान झालेले नाही.

रेल्वेमंत्र्यांनी या पोस्टमध्ये म्हटले आहे की, या दुर्घटनेतील पुरावे ताब्यात घेण्यात आले आहेत. आयबी आणि उत्तर प्रदेश पोलीस घटनेचा तपास करत आहेत. सुदैवाने या अपघातात कुणालाही दुखापत झालेली नाही. प्रवाशांसाठी अहमदाबाद येथे जाण्यासाठी रेल्वेची व्यवस्था करण्यात आली आहे.

दरम्यान, कानपूरचे एडीएम (सिटी) राकेश वर्मा यांनी सांगितले की, साबरमती एक्स्प्रेसचे (Sabarmati Express) २२ डबे रुळांवरून उतरले. सुदैवाने यात कुणी जखमी झाले नाहीत. सर्व प्रवाशांना बसमधून स्टेशनवर पाठवण्यात येत आहे. तसेच एक मेमू गाडीही येथे येत आहे.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.