-
प्रतिनिधी
राज्यातील आर्थिक दृष्ट्या गरजू रुग्णांसाठी मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणावर अर्थसहाय्य दिले जात आहे. मार्च महिन्यात या कक्षामार्फत २,५१७ रुग्णांना तब्बल २२ कोटींहून अधिक मदत करण्यात आली. त्यात मेंदू विकारांवरील उपचारांसाठी सर्वाधिक मदत वितरीत करण्यात आल्याची माहिती कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी दिली. (CM Relief Fund Cell)
आरोग्य सहाय्याचा व्यापक विस्तार
मार्च महिन्यात मेंदू विकारांवरील उपचारांसाठी ४७१ रुग्णांना, कर्करोग उपचारांसाठी ४२१ रुग्णांना, हिप रिप्लेसमेंटसाठी ३०६ रुग्णांना, अपघातातील शस्त्रक्रियेसाठी २४७ रुग्णांना, हृदयविकार उपचारांसाठी २३९ रुग्णांना, अपघातग्रस्त १८४ रुग्णांना, नी रिप्लेसमेंटसाठी १५० रुग्णांना आणि बालरोग उपचारांसाठी १४५ रुग्णांना आर्थिक मदत मिळाली. (CM Relief Fund Cell)
(हेही वाचा – वक्फ सुधारणा विधेयक बुधवारी संसदेत होणार सादर; Uddhav Thackeray कोणती भूमिका घेणार?)
रुग्णांसाठी दिलासा ठरत आहे मदतीचा हात
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या मुख्यमंत्री सहायता निधी कक्षाच्या माध्यमातून गरजू रुग्णांना उपचारांसाठी मदत मिळत आहे. या मदतीमुळे अनेक रुग्ण आणि त्यांच्या कुटुंबीयांचे संकट हलके होत असल्याचे मत लाभार्थींनी व्यक्त केले. (CM Relief Fund Cell)
दानशूर व्यक्तींनी पुढाकार घ्यावा – कक्षप्रमुखांचे आवाहन
राज्यातील अधिकाधिक गरजू रुग्णांपर्यंत मदत पोहोचवण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मुख्यमंत्री सहायता निधी कक्षास मदत करावी, असे आवाहन कक्षप्रमुख रामेश्वर नाईक यांनी केले. तसेच या कक्षाच्या मदतीची माहिती गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी समाजातील संवेदनशील घटकांनी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी नमूद केले. (CM Relief Fund Cell)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community