Gaming Zone Fire Case: गुजरातमध्ये गेमिंग झोनच्या आगीत 22 जण ठार

जखमींवर तातडीने उपचार करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

153
Gaming Zone Fire Case: गुजरातमध्ये गेमिंग झोनच्या आगीत 22 जण ठार

गुजरातच्या राजकोट येथील गेमिंग झोनला लागलेल्या आगीत 22 जण मृत्यूमुखी पडले आहेत. यामध्ये लहान बालकांसह अनेक जण अडकले असून मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जाते. (Gaming Zone Fire Case)

गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये लागलेल्या भीषण आगीत 22 जणांचा मृत्यू झाला आहे. आगीच्या घटनेमुळे संपूर्ण गेम झोन जळून गेला आहे. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. बचावकार्यासह आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी खूप प्रयत्न करावे लागले. यामध्ये लहान मुलांसह अनेक जण अडकले असण्याची शक्यता आहे. राजकोटचे पोलीस आयुक्त राजू भार्गव यांनी सांगितले की, टीआरपी गेमिंग झोनमध्ये दुपारी आग लागली. बचावकार्य सुरू आहे. आग आटोक्यात आली आहे. आतापर्यंत 22 मृतदेह बाहेर काढण्यात आले असून ते पुढील तपासासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले आहेत.आम्ही जास्तीत जास्त मृतदेह बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहोत. गेमिंग झोनची मालकी युवराज सिंग सोलंकी नावाच्या व्यक्तीकडे आहे. झालेल्या मृत्यूबाबत निष्काळजीपणा केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. आम्ही येथे बचाव कार्य पूर्ण केल्यानंतर पुढील तपास करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. (Gaming Zone Fire Case)

(हेही वाचा – बच्चू कडूंनी तात्कालिक उद्वेग करून वागू नये; Pravin Darekar यांचा सल्ला)

गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल आपल्या ट्विटर संदेशात म्हणाले की, राजकोटमधील गेम झोनमध्ये आगीच्या घटनेत महापालिका आणि प्रशासनाला तातडीने बचाव आणि मदत कार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. जखमींवर तातडीने उपचार करण्याला प्राधान्य देण्याच्या सूचनाही देण्यात आल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.