Students Attempted Suicide : ‘या’ कारणामुळे २२ विद्यार्थ्यांची आत्महत्या

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले आहे

219
Students Attempted Suicide : 'या' कारणामुळे २२ विद्यार्थ्यांची आत्महत्या
Students Attempted Suicide : 'या' कारणामुळे २२ विद्यार्थ्यांची आत्महत्या

आयआयटी, जेईई, नीट या परीक्षांच्या तणावामुळे विद्यार्थी आता आत्महत्या करत असल्याचे उघडकीस येत आहे. यंदाच्या वर्षांत केवळ आठ महिन्यांत २२ विद्यार्थ्यांनी या परीक्षांचा तणाव सहन न झाल्याने आत्महत्या केल्या आहेत. निवृत्त प्राचार्य आणि समुपदेशक सुदाम कुंभार यांनी पालकांना मुलांवर अपेक्षांचे ओझे टाकू नये असे आवाहन केले आहे. मुलांची मानसिकता ओळखा, त्यांना झेपणार नसलेल्या स्पर्धेत उतरवू नका असा संदेश वृत्त प्राचार्य आणि समुपदेशक सुदाम कुंभार यांनी पालकांना दिला आहे.

स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आत्महत्येचे प्रमाण गेल्या काही वर्षांपासून वाढू लागले आहे. मुलांच्या करिअर निवडीची ओळख लक्षात न घेता कित्येकदा पालक त्यांचे करिअर ठरवतात. आयआयटी, जेईई, नीट या परीक्षांसाठी सातत्याने अभ्यास करायची गरज असते. दिवसाचे बरेच तास त्यांना अभ्यास आणि स्पर्धा परीक्षांचा सराव करावा लागतो. स्पर्धा परीक्षांमध्ये पास न झाल्यास वर्ष फुकट जाण्याची भीती असते. नापास झाल्यास पालकांचा ओरडा मिळेल, करियर संपेल या भीतीने प्रचंड मानसिक तणावात राहतात. पालकांची साथ नसल्याने मुलांना जगण्यातला रस निघून जातो. स्पर्धा परीक्षांचा निकाल जाहीर होण्यापूर्वीच बरेचदा मुले टोकाचे निर्णय घेतात.

पालकांसाठी खास सल्ला –

  • मुलांची क्षमता त्यांच्या तेराव्या किंवा चौदाव्या वर्षी ओळखावी.
  • शालेय जीवनातच मुलांच्या आवडत्या विषयाचा कल समजून घ्या.
  • जास्त विचार करणे टाळा.
  • मुलांची चिकित्सक वृत्ती ओळखा. मुलं करियर म्हणून कोणत्या क्षेत्राकडे जाण्यास उत्सुक आहे, याबद्दल मुलांशी सविस्तर चर्चा करा.
  • मुलांच्या करिअर निवडीसाठी समुपदेशकांची मदत घ्या.
  • वयात आलेल्या मुलांवर हात उगारणे टाळा.
  • दोन पिढ्यांची तुलना करू नका. काळानुसार पारंपारिक करिअरची क्षेत्रे आता पाठी पडू लागली आहेत.
  • मुलांना करिअर निवडीचे स्वातंत्र्य द्या.

(हेही वाचा – Mill Worker : गिरणी कामगारांसाठी पाच हजार घरांची सोडत

सात वर्षात ११७ विद्यार्थ्यांचा मृत्यू –
राजस्थान येथील कोटा शहरात परीक्षांच्या तयारीसाठी देशभरातून विद्यार्थी येतात. गेल्या सात वर्षांत ११७ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली आहे.

वर्ष आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या –

  • २०१५ – १८
  • २०१६ – १७
  • २०१७ – ७
  • २०१८ – २०
  • २०१९ – १८
  • २०२२ – १५
  • २०२३ – २२

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.