घोटाळे करून पळालेले व्यावसायिक विजय मल्ल्या (Vijay Mallya) आणि नीरव मोदी (Nirav Modi) यांच्याकडून पैसे वसूल केले आहेत. पीएमएलए कायद्यानुसार ईडीने आतापर्यंत २२,२८० कोटी रुपये वसूल केले आहेत. आम्ही कुणालाही सोडले नाही. भलेही ते देश सोडून पळाले असतील. आम्ही त्यांच्या मागे लागलो आहोत. ईडीने त्यांच्याकडून पैसा गोळा करून तो पुन्हा बँकात जमा केला आहे. आर्थिक घोटाळे करणाऱ्या एकाही आरोपीला आम्ही सोडणार नाही. आम्ही त्यांच्या मागावर रहाणारच. जो पैसा बँकांचा आहे, तो बँकांना परत मिळालाच पाहिजे, अशी माहिती केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी संसदेत दिली.
(हेही वाचा – CM Devendra Fadnavis यांच्या हस्ते गृह विभागाच्या नवीन संकेतस्थळाचे अनावरण)
आर्थिक घोटाळे करणाऱ्या विरोधात यापुढेही कारवाई सुरूच राहील, असे केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी संसदेत सांगितले आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ साठी पुरवणी मागण्यांची चर्चा लोकसभेत सुरू असताना त्यांनी सांगितले की, विजय मल्ल्याकडून १४,१३१.६ कोटी रुपयांची संपत्ती वसूल करून ती सार्वजनिक क्षेत्रातील बँकेला परत देण्यात आल्याची माहिती लोकसभेत दिली. तसेच नीरव मोदी यांच्या प्रकरणात १,०५२.५८ कोटी रुपये वसूल करण्यात आले आहेत.
ईडी आणि बँकांनी संयुक्तपणे विशेष न्यायालयाच्या माध्यमातून हिरे व्यापारी नीरव मोदी आणि मेहुल चोक्सी यांच्या विरोधात कारवाई केली. चोक्सी आणि मोदी यांनी एकत्रितपणे पंजाब नॅशनल बँकेची १३ हजार कोटींची फसवणूक केली होती. चोक्सीकडून २,५६६ कोटी रुपयांची संपत्ती वसूल करण्यात आली असून त्यांचा लिलाव करण्यात आला आहे, अशीही माहिती अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी दिली.
हेही पहा –
Join Our WhatsApp Community