बांगलादेशातील (Bangladesh) हिंदूंवर (Hindu) दिवसेंदिवस अत्याचार वाढत आहेत. भारत सरकारने याबाबत अनेकदा बांगलादेशकडे आक्षेप नोंदवले आहेत. असे असतानाही हिंसाचाराच्या घटनांमध्ये कोणतीही घट झालेली नाही. लोकसभेत परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, यावर्षी दि. ८ डिसेंबरपर्यंत २२०० हिंदू (Hindu) आणि अल्पसंख्याकांवर अत्याचार झाले आहेत. तर पाकिस्तानमध्ये ११२ हिंदू (Hindu) हिसांचाराचे बळी ठरले आहेत. त्यामुळे बांगलादेशात पाकिस्तानपेक्षा कितीतरी पट जास्त हिंदू हिंसाचाराचे बळी ठरत आहेत.
केंद्रीय परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंह (Kirti Vardhan Singh) यांनीही त्यांच्या उत्तरात सांगितले की, बांगलादेशमध्ये (Bangladesh) २०२२ मध्ये ४७ हिंदू आणि अल्पसंख्याक तर २०२३ मध्ये ३०२ लोक हिंसाचाराचे बळी ठरले आहेत. त्याच काळात पाकिस्तानमध्ये (Pakistan) अनुक्रमे २४१ आणि १०३ हिंदूवर हिंसाचार झाल्याचेही त्यांनी सांगितले. ते म्हणाले, बांगलादेश (Bangladesh) आणि पाकिस्तान (Pakistan) वगळता भारताच्या शेजारील कोणत्याही देशात हिंदू हिंसाचाराला बळी पडलेले नाहीत, असेही ते म्हणाले. (Kirti Vardhan Singh)
हेही पाहा :
Join Our WhatsApp Community