ब्रिटनचे ‘साउथैम्प्टन’ हे नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत भारतात आपले कॅम्पस स्थापन करणारे पहिले परदेशी विद्यापीठ ठरले आहे, याबाबतची घोषणा केंद्राने गुरुवारी केली आहे. यूजीसीने गेल्या वर्षी परदेशी शैक्षणिक संस्थांसाठी नियम जाहीर केले होते. त्यानसार आता गुरुग्राममध्ये साउथेंम्प्टनची स्थापना होणार आहे. University of Southampton)
विद्यापीठ अनुदान आयोगाने (युजीसी) २०२३ मध्ये भारतात विदेशी उच्च शैक्षणिक संस्थांच्य कॅम्पसची भारतात पहिलेच परदेशी विद्यापीठाची स्थापना आणि संचालनाची घोषणा केली होती. त्यानंतर, साउथैम्प्टन विद्यापीठाने गुरुग्राममध्ये शाखा उघडण्याचा प्रस्ताव सादर केला होता, ज्याला नियमांनुसार इरादा पत्र (एलओआय) जारी करण्यासाठी युजीसी स्थायी समितीने मान्यता दिली. त्यानंतर, साउथम्प्टन विद्यापीठाच्या प्रतिनिधींना परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर (S. Jaishankar) यांनी एका कार्यक्रमात हे इरादा पत्र सुपूर्द केले. (University of Southampton)
(हेही वाचा- Chandrakant Patil : विद्यार्थिनींच्या वसतिगृहातील सुरक्षेत दिरंगाई झाल्यास कठोर कारवाई…!)
२०२५ मध्ये अभ्यासक्रमांना सुरुवात
साउथम्प्टन विद्यापीठाच्या (University of Southampton) भारतातील कॅम्पसद्वारे प्रदान केलेल्या पदव्या यजमान विद्यापीठासारख्याच असतील. साउथम्प्टन विद्यापीठाचा भारतीय कॅम्पस जुलै २०२५ मध्ये त्याचे शैक्षणिक अभ्यासक्रमांना सुरुवात करेल, अभ्यासक्रम व्यवसाय आणि व्यवस्थापन, कायदा, अभियांत्रिकी, कला आणि डिझाइन, बायोसायन्स आणि जीवन विज्ञान या विषयांवर केंद्रित असतील, अशी माहिती युजीसीचे अध्यक्ष जगदेश कुमार यांनी दिली आहे. (University of Southampton)
हेही पहा-
Join Our WhatsApp Community