Water Cut : वादळी वारा आणि अवकाळी पावसामुळे पवई येथील 22KV विद्युत उपकेंद्रात बिघाड, या भागांत पाणीपुरवठा खंडित

विद्युत उपकेंद्राची दुरूस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे.

2045
Water Cut : मुंबईत गुरुवार आणि शुक्रवारी ५ ते १० टक्के पाणीकपात 

वादळवारा आणि अवकाळी पावसामुळे सोमवारी १३ मे २०२४ रोजी सायंकाळी ५ वाजता पवई येथील २२ केव्ही विद्युत उपकेंद्राचे नुकसान झाले आहे. पवई उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठादेखील खंडित झाला आहे. त्यामुळे महानगरपालिकेच्या एल आणि एस विभागातील काही परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. विद्युत उपकेंद्राची दुरूस्ती व पवई उदंचन केंद्रातील विद्युत पुरवठा सुरळीत झाल्यावर या दोन्ही विभागात पाणीपुरवठा करण्यात येणार असल्याचे महानगरपालिका प्रशासनाकडून कळविण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांनी पाणी जपून व काटकसरीने वापरावे असे आवाहनदेखील करण्यात आले आहे. (Water Cut)

मुंबईमध्ये सोमवारी सायंकाळी १३ मे २०२४ झालेल्या वादळी वारा आणि पावसामुळे पवई येथील २२ केव्ही उदंचन केंद्राला होणारा विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. या बेमोसमी पावसामुळे पवई परिसरातील विद्युत उपकेंद्रातील अनेक उपकरणांमध्ये बिघाड झाला आहे. अनेक ठिकाणच्या वीजवाहिन्याही तुटल्या असून, अनेक महत्त्वाच्या उपकरणांचे प्रचंड नुकसान झाले आहे. तसेच अंधारात दुरुस्तीच्या कामांमध्ये विलंब होण्याची शक्यता आहे. यामुळे एस विभागातील मोरारजी नगर, जय भीम नगर, पासपोली गावठाण, लोकविहार सोसायटी, रेनेसेन्स हॉटेल परिसरात पाणीपुरवठा होणार नाही. तर महात्मा फुले नगरच्या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होणार आहे. (Water Cut)

(हेही वाचा – Crime : प्रवाशाची ६६ लाख रोकड असलेली बॅग रिक्षाचालकाने पळवली, पोलिसांनी १२ तासांत शोधले)

या भागांत राहणार पाणीपुरवठा बंद 

कुर्ला एल विभागात काजूपाडा, गणेश मैदान, इंदिरानगर, संगम सोसायटी, शास्त्रीनगर, गॅस कंपाउंड, चित्रसेन गाव, मसरानी लेन, गाजी दर्गा रोड, ए. एच. वाडिया मार्ग, वाडिया इस्टेट, एम. एन रोड बैल बाजार, संदेश नगर, क्रांती नगर, एल.बी.एस.कमानी, कल्पना टॉकीज, किस्मत नगर, गफुर खान इस्टेट, संभाजी चौक, न्यू मिल रोड, रामदास चौक, ईगलवाडी, आण्णासागर मार्ग, ब्राह्मण वाडी, पटेल वाडी, एस जी बर्वे मार्ग, बुद्ध कॉलनी, न्यू मिल रोड मार्ग विनोबा भावे मार्ग, नावपडा, प्रमियर रसिडेन्स, सुंदरबाग, शिव टेकडी संजय नगर, कपाडिया नगर, रूपा नगर, न्यू मिल रोड, ताकिया वॉर्ड, मॅच फॅक्टरी लेन, शिवाजी कुटीर लेन, टॅक्सीमन कॉलनी, इंदिरा नगर, महाराष्ट्र काटा, एल. बी. एस रोड, चाफे गल्ली, चूनाभट्टी, सेवक नगर, विजय नगर आणि जरी मरी माता मंदिर परिसरात पाणीपुरवठा बंद राहणार आहे. (Water Cut)

महानगरपालिका प्रशासनाकडून दुरुस्तीचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात आले आहे. तसेच दुरुस्तीची कामे पूर्ण होईपर्यंत वरील परिसरातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे. सदर दुरुस्ती झाल्यावर पवई उच्च स्तरीय जलाशय क्रंमांक कप्पा क्रमांक २ भरून पाणीपुरवठा हळूहळू सुरळीत करण्यात येईल. अचानक उद्भवलेल्या या अडचणींमुळे पाणीपुरवठा होऊ न शकल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे, त्याबद्दल महानगरपालिका प्रशासनाने दिलगीर व्यक्त केली आहे. (Water Cut)

हेही पहा –

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.