Flash Floods In Sikkim : सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरामुळे लष्कराचे मोठे नुकसान, 23 जवान बेपत्ता

उत्तर सिक्कीममधील सिंगटामजवळ बरडांग येथे पार्क केलेल्या लष्कराच्या वाहनांना पुराचा तडाखा बसला असून लष्कराचे २३ जवान बेपत्ता आहेत. त्यांची शोध मोहीम सुरू आहे.

166
Flash Floods In Sikkim : सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरामुळे लष्कराचे मोठे नुकसान, 23 जवान बेपत्ता
Flash Floods In Sikkim : सिक्कीममध्ये अचानक आलेल्या पुरामुळे लष्कराचे मोठे नुकसान, 23 जवान बेपत्ता

उत्तर सिक्कीममधील लोनाक तलावावर अचानक ढग फुटल्याने लाचेन खोऱ्यातील तीस्ता नदीला पूर आला. (Flash Floods In Sikkim) त्यामुळे खोऱ्यातील काही लष्करी तुकड्यांना फटका बसला आहे. या अचानक आलेल्या पुरानंतर लष्कराचे २३ जवान बेपत्ता झाले आहेत. चुंगथांग धरणातून पाणी सोडल्यामुळे, पाण्याची पातळी अचानक 15-20 फूट इतकी वाढली आहे आणि सिक्कीमच्या अनेक भागांत पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. सिंगतामजवळ बरडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांना पुराचा तडाखा बसला असून लष्कराचे २३ जवान बेपत्ता आहेत. शोधमोहीम सुरू आहे. याशिवाय काही वाहने चिखलात बुडाल्याचेही वृत्त आहे. (Flash Floods In Sikkim)

(हेही वाचा – Nagpur Patients Death : आता नागपूर मध्ये एकाच दिवसात २५ जणांचा मृत्यू ,राज्याची आरोग्यव्यवस्थाच व्हेंटिलेटरवर)

चुंगथांग धरणातून पाणी सोडल्याचा परिणाम – संरक्षण पीआरओ

परिस्थितीची माहिती देताना संरक्षण पीआरओ म्हणाले की, चुंगथांग धरणातून पाणी सोडण्यात आल्याने डाउनस्ट्रीम पाण्याची पातळी अचानक 15-20 फूट उंचीवर गेली. त्यामुळे सिंगतामजवळील बारडांग येथे उभ्या असलेल्या लष्कराच्या वाहनांची कोंडी झाली. येथे उभी असलेली 41 लष्कराची वाहने बुडाली आहेत. खोऱ्यातील काही लष्करी आस्थापनांवर परिणाम झाला असून तपशीलांमचा तपास करण्याचे काम चालू आहे. २३ कर्मचारी बेपत्ता असून काही वाहने चिखलात बुडाल्याची माहिती आहे. (Flash Floods In Sikkim)

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने इशारा दिला

सिक्कीम राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने (एसएसडीएमए) चेतावणी जारी केली आहे आणि म्हटले आहे की, मंगन जिल्ह्याच्या उत्तर भागात ढग फुटल्यामुळे तिस्ता नदीला पूर आला आहे. त्यासाठी सर्वांना सतर्कतेचा सल्ला देण्यात आला आहे. नागरिकांनी खोऱ्यातील नदीकाठी प्रवास टाळावा. (Flash Floods In Sikkim)

उपायुक्त नामची यांनी सांगितले की, मुसळधार पावसामुळे आदर्शगाव, समर्दुंग, मेल्ली आणि इतर संवेदनशील ठिकाणांवरील सर्व रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. सर्वसामान्य जनतेने अफवा पसरवू नये आणि घाबरून जाऊ नये असे आवाहन करण्यात आले आहे. राज्यात अचानक आलेल्या आपत्तीमुळे सोरेंग येथील नरबहादूर भंडारी जयंती उत्सव रद्द करण्यात आला आहे. तिस्ता नदीला आलेल्या पुरामुळे सिक्कीममधील सिंगथम फूटब्रिजही कोसळला आहे. जलपाईगुडी प्रशासनाने तिस्ता नदीच्या खालचा भाग रिकामा करण्यास सुरुवात केली आहे. (Flash Floods In Sikkim)

हेही पहा – 

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.