शिक्षक चालले संपावर! कधी राहतील शाळा बंद?

108

राज्य सरकारी, निम-सरकारी शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी संघटना समन्वय समितीने 23, 24 फेब्रुवारी रोजी पुकारलेल्या राज्यव्यापी लाक्षणिक संपात प्राथमिक शिक्षकांनी सहभागी होण्याचे आवाहन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष उदय शिंदे, राज्य सरचिटणीस विजय कोंबे, जिल्हाध्यक्ष गोकुलदास राऊत यांनी केले आहे.

राज्य सरकारी, निम-सरकारी कर्मचारी, शिक्षकांचे अनेक प्रश्न शासनाकडे प्रदीर्घकाळ प्रलंबित आहेत. त्याचप्रमाणे जिल्हा परिषद, नगर पालिका, महानगरपालिकांच्या शाळांतील विद्यार्थी, प्राथमिक शिक्षक आणि शाळांच्या संबंधाने असणाऱ्या मागण्यांकडे शासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आक्षेप राज्य प्राथमिक शिक्षक समितीने घेतला आहे. विद्यार्थी आणि शिक्षकांच्या न्यायोचित मागण्यासाठी होणाऱ्या लाक्षणिक संपात जिल्हा परिषद, महानगर पालिका, नगर पालिकांच्या प्राथमिक शिक्षकांनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

(हेही वाचा फडणवीस सरकारमध्ये हरियाणाचा दूधवाला 7 हजार कोटींंचा मालक कसा झाला?)

काय आहेत शिक्षकांच्या मागण्या?

जुनी पेन्शन योजना, शिक्षक सेवकांचे अत्यल्प मानधन, बक्षी समितीचा खंड-2 प्रसिद्ध करणे, वेतन त्रुटी दूर करणे, विद्यार्थ्यांमध्ये भेदभाव न करता मोफत गणवेश योजना, विद्यार्थिनी दैनिक उपस्थिती भत्ता वाढविणे, सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना, अनुकंपा तत्त्वावरील नोकन्या, कोविड -19 कर्तव्यावर असताना कोविडमुळे मृत्यू झालेल्या शिक्षकांचे विमा कवच, वस्तीशाळा-अप्रशिक्षित शिक्षकांच्या सेवाविषयक, जिल्हांतर्गत-आंतरजिल्हा बदली धोरण, जिल्हा बदली झालेल्या शिक्षकांची आधीच्या जिल्ह्यातील सेवा ज्येष्ठता, नगरपालिका शिक्षकांचे वेतन विषयक प्रश्न, अर्जित रजा रोखीकरण, प्रशिक्षण शुल्क रद्द करणे, विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्ती परीक्षा शुल्कात कपात करणेयासह अन्य प्रलंबित मागण्यांच्या सोडवणुकीसाठी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती दोन दिवसाच्या लाक्षणिक संपात सहभागी होत असल्याची माहिती शिक्षक समितीचे राज्य प्रसिध्दी प्रमुख राजेश सावरकर यांनी दिली आहे.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.