Whatsapp Account : जुलै महिन्यात तब्बल २३ लाख व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन

197

व्हॉट्सअ‍ॅप हे जगभरातील लोकप्रिय मेसेजिंग अ‍ॅप आहे. भारतात ४०० दशलक्षाहून अधिक वापरकर्ते असलेल्या व्हॉट्सअ‍ॅपने जुलै महिन्यात जवळपास २३ लाख अकाउंट बॅन केली आहेत. आयटी नियम २०२१ नुसार ही अकाउंट्स बॅन करण्यात आली असल्याची माहिती मिळाली आहे. मागील महिन्याच्या तुलनेत यंदा बॅन करण्यात आलेल्या अकाउंट्सची संख्या वाढली आहे. कंपनीने जून महिन्यात २२ लाख खात्यांवर बंदी घातली होती. यानंतर जुलैमध्ये ही संख्या २३ लाखांहून अधिक झाली आहे.

( हेही वाचा : पश्चिम रेल्वेत परीक्षेविना नोकरीची संधी! असा करा ऑनलाईन अर्ज)

अशाप्रकारचे अकाउंट्स व्हॉट्सअ‍ॅपमधून बॅन केले जातात

वापरकर्त्यांची तक्रार केली असल्यास, व्हॉट्सअ‍ॅपच्या धोरणांचे उल्लंघन करणे, खोटी माहिती पसरवणे, सायबर सुरक्षेचे उल्लंघन करणे अशा खात्यांवर बंदी घालण्यात आली आहे. जुलै महिन्यात कंपनीने एकूण २३ लाख ८७ हजार व्हॉट्सअ‍ॅप अकाउंट बॅन केले आहेत. व्हॉट्सअ‍ॅप अशाप्रकारे दरमहिन्याला अकाउंटवर बंदी घालते किंवा काढून टाकते.

जर कोणी तुमच्याशी गैरवर्तन केले असेल तर तुम्ही त्यांच्या खात्यांची तक्रार करू शकता. काही प्रसंगी तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅपला स्क्रिनशॉट सेंड करावे लागतात. याशिवाय व्हॉट्सअ‍ॅपवर वापरकर्त्याला सहजपणे तुम्ही ब्लॉक करू शकता. जेव्हा तुम्ही संबंधित युजरची तक्रार करता तेव्हा तुम्हाला व्हॉट्सअ‍ॅप चॅटचे शेवटचे ५ मेसेज पाठवावे लागतील.

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.