दोन दिवसांत राज्यात नव्या २३ ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या नोंदीने आतापर्यंतच्या रुग्णांची संख्या थेट ८८ वर पोहोचली आहे. त्यामुळे वर्षाअखेरिच्या नाताळ आणि नववर्षाच्या स्वागतावरील सेलिब्रेशनचे नियम अजूनच कडक होण्याची भीती व्यक्त होत आहे. देशात ओमायक्रॉन जीवघेणा नसला तरीही महाराष्ट्रासह देशातही जोमाने पसरत असल्याने पुढीन दोन-तीन महिन्यांत परिस्थिती नियंत्रणान न आल्यास आणि वेगाने ओमायक्रॉन पसरल्यास महाराष्ट्रात तिस-या लाटेची भीती पसरण्याचा अंदाज व्यक्त होत आहे.
गुरुवारी आढळून आलेल्या २३ नव्या रुग्णांपैकी ४ मुले ही १८ वर्षांखालील मुले आहेत. राज्यात पहिल्यांदाच दोन ज्येष्ठांमध्येही ओमायक्रॉनची बाधा आढळून आली. २३ रुग्णांपैकी २२ रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनकडून तर १ रुग्ण राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळेच्या अहवालातील सकारात्मक चाचणीतून समजले.
( हेही वाचा : मुंबईकरांनो सावधान, कोविडच्या रुग्णांचा वाढतोय आकडा )
नव्या २३ रुग्णांबाबत
पुणे — १३ रुग्ण ( पुणे मनपा आणि पुणे ग्रामीण प्रत्येकी ३, पिंपरी चिंचवड — ७)
मुंबई — ५ रुग्ण
उस्मानाबाद — २ रुग्ण
ठाणे मनपा, नागपूर मनपा आणि मीरा भाईंदर मनपा — प्रत्येकी १ रुग्ण आढळून आला
- गुरुवारी नोंद झालेल्या नव्या २३ रुग्णांपैकी १६ रुग्ण आंतरराष्ट्रीय प्रवासी तर ७ रुग्ण सहसंपर्कातून ओमायक्रॉनबाधित आढळले.
- रुग्णांच्या आंतरराष्ट्रीय प्रवासाचा इतिहास
- मध्यपूर्व देश — ६ रुग्ण, युरोप — ४ रुग्ण, घाना आणि दक्षिण आफ्रिका — प्रत्येकी २ रुग्ण, सिंगापूर आणि टांझानिया — प्रत्येकी १ रुग्ण
- १७ रुग्ण लक्षणेविरहीत तर ६ रुग्णांना सौम्य लक्षणे आहेत
- केवळ १८ रुग्णांचे लसीकरण झाले आहे.