‘या’ शहरांत एकाच दिवशी ओमायक्रॉनचे एवढे रुग्ण…

126

मुंबईत केवळ २ हजार ९२५ कोरोना रुग्ण उरले असताना, याच आकडेवारीत एकाच दिवशी तब्बल २२६ ओमायक्रॉनच्या रुग्णांची भर पडली आहे. त्याखालोखाल ओमायक्रॉनचे केंद्रबिंदू बनलेल्या पुणे शहरातही ११ ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे.

या शहरांत सापडले नवे रुग्ण

शनिवारी राज्यात ओमायक्रॉनचे २३७ नवे रुग्ण आढळले. त्यापैकी पुण्यातील ११ नव्या रुग्णांचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह असल्याची माहिती पुण्यातील बी.जे.वैद्यकीय महाविद्यालयाने दिली. तर मुंबईतील २२६ ओमायक्रॉनच्या रुग्णांच्या जनुकीय चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह असल्याचे कस्तुरबा रुग्णालयाकडून सांगण्यात आले.

(हेही वाचाः पुण्यातील कोविड सेंटरचं कंत्राट मुंबईतील ‘त्या’ चहावाल्याला! सोमय्यांचा खळबळजनक दावा)

ओमायक्रॉनचे इतके सक्रीय रुग्ण

रुग्णांवर त्वरित उपचार होत असल्याने तसेच ओमायक्रॉन विषाणू अगोदरच्या डेल्टा विषाणूच्या तुलनेत फारसा घातक नसल्याने उपचार घेऊन पटकन बरे होणा-या रुग्णांची संख्याही जास्त दिसून येत आहे. आतापर्यंत ३ हजार ७६८ ओमायक्रॉनबाधित रुग्ण राज्यात आढळले असून, त्यापैकी ३ हजार ३३४ रुग्णांना डिस्चार्ज मिळाला आहे. आता केवळ ४३४ ओमायक्रॉनच्या रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तपासणी नमुन्यांची संख्या हजारीपार

शुक्रवारी १ हजार ३०६ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित होता. त्यात शनिवारी २२५ नमुन्यांची भर पडली. या नमुन्यांचा अहवाल अद्यापही संबंधित प्रयोगशाळांकडून कळवला गेला नसल्याने राज्यात एकूण १ हजार ५३१ नमुन्यांचा अहवाल प्रलंबित आहे.

(हेही वाचाः रविवारी बाहेर पडताय? जाणून घ्या कोणत्या मार्गावर असणार मेगाब्लॉक)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.