
-
प्रतिनिधी
शहरात वाढत्या सायबर गुन्ह्यांना रोखण्यासाठी डिजिटल रक्षकांची फौज तयार करण्यात आली आहे. डिजिटल रक्षक हे २४ तास सेवेसाठी तैनात करण्यात आले आहे. सायबर फसवणुकीला बळी पडलेले किंवा सायबर जाळ्यात अडकलेल्यांच्या मदतीसाठी डिजिटल रक्षक मदत क्रमांक देण्यात आले आहे. दूरध्वनी किंवा व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून पोलिसांशी संपर्क साधून ‘डिजिटल रक्षकां’ ची मदत घेऊ शकता. हे डिजिटल रक्षक सायबर फसवणुकीपासून बचावाकरिता नागरिकांना योग्य ते मार्गदर्शन करतील अशी माहिती मुंबई पोलीस दलातील एका अधिकाऱ्याने दिली आहे. (Cyber Security)
देशभरात सायबर गुन्हेगारीत मोठी वाढ झाली आहे. बनावट लिंक वर क्लिक केल्यामुळे लोक आर्थिक फसवणुकीला बळी पडत आहेत. मुंबई सारख्या शहरात दररोज अनेक जण सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकून आयुष्यभराची कमाई गमावून बसतात. सेक्सटॉर्शन, जॉब रॅकेट, शेअर्स मार्केट गुंतवणूक, डिजिटल अरेस्ट, ऑनलाईन कर्ज, विवाहसंकेत स्थळ, पार्ट टाईम जॉब, ऑनलाइन खरेदी या सारखे अनेक सायबर फसवणुकीचे प्लॅटफॉर्म उपलब्ध आहेत. हे प्लॅटफॉर्म योग्यरित्या हाताळल्यास होणाऱ्या फसवणुकीपासून वाचू शकता. मात्र अनेक जण यामध्ये गुंतून जातात आणि फसवणुकीला बळी पडतात. (Cyber Security)
(हेही वाचा – छत्रपती संभाजीनगरात राजनाथ सिंह यांच्या हस्ते Maharana Pratap पुतळ्याचे अनावरण)
फसवणुक करणारे हे नामांकीत कुरियर कंपनीचे प्रतिनिधी बोलत असल्याचे भासवून आपल्या नावे आंतरराष्ट्रीय कुरियर, पार्सल बुक केले असून त्यामध्ये ड्रग्ज, हत्यारे, बनावट पासपोर्ट, अवैद्य सिम कार्ड, हवालाचे पैसे किंवा इतर अनाधिकृत गोष्टी असल्याबाबत संपर्क साधून सायबर गुन्हे घडत आहेत. त्यामध्ये ते पोलीस, आयकर विभाग, आय. बी, सी. बी. आय, ई. डी. इत्यादी शासकीय विभागाचे अधिकारी असल्याची बतावणी करून किंवा सोशल मिडीया माध्यमातून अशा अधिकाऱ्यांचे बनावट ओळखपत्र व संबधित नोटीस पाठवून नागरिकांना घाबरवून, अटक करण्याची भीती दाखवून पीडितांना पैसे पाठविण्यास भाग पाडतात. अशा प्रकारच्या गुन्ह्यांना प्रतिबंध घालण्यासाठी मुंबई पोलिसांकडून नागरिकांना ७७१५००४४४४ व ७४०००८६६६६ हे मोबाईल क्रमांक नव्याने उपलब्ध करुन देण्यात येत असून याद्वारे नागरिकांना कॉलद्वारे किंवा व्हॉट्सअॅपच्या् माध्यमातून पोलिसांना संपर्क साधता येईल. (Cyber Security)
“डिजिटल रक्षक” हेल्पालाईन सुविधा ही २४ तास कार्यरत राहणार आहे. त्यामध्ये नागरिकांनी नमुद क्रमांकांवर संपर्क केल्यास, फसवणुकीला बळी पडण्यापूर्वी संशयास्पद कॉल्सची व पाठविलेल्या कोणत्याही सरकारी दस्तऐवजाची देखील वैधता पडताळणी करू शकतात. तसेच घटनेचे गांभीर्य ओळखून प्रभावी प्रतिसाद सुनिश्चित करणे व पीडितांमधील भीती आणि त्रास कमी करण्यासाठी तेथे तात्काळ सायबर पोलिसांचे अथवा स्थानिक पोलीस ठाण्यांचे पथक पाठवून डिजिटल अटक फसवणूक प्रकरणात पिडीताला समुपदेशन करून मदत करण्यात येईल. त्याचप्रमाणे नागरिकांना सायबर फसवणुकीपासून बचावाकरिता योग्य ते मार्गदर्शन करण्यात येणार आहे. (Cyber Security)
हेही पहा –
Join Our WhatsApp Community