नाशिकमधून रेशनिंगच्या धान्याची खुल्या बाजारात विक्री, लाखो रुपयांचे धान्य जप्त

98

नाशिक येथे मोठ्या प्रमाणात रेशनिंगच्या दुकानात विक्री होणाऱ्या धान्याची खुल्या बाजारात विक्री करण्यात आली, याचा भांडाफोड नाशिक ग्रामीण पोलिसांकडून करण्यात आला. यावरून कळवणमध्ये एका गोडावूनवर छापा टाकत पोलिसांनी २४ लाख रुपयांचा गहू आणि तांदूळ जप्त केला. यावेळी पोलिसांनी संशयितांस ताब्यात घेण्यात घेतले आहे.

कशी केली कारवाई?

रेशनिंगचे धान्य अवैधपणे खुल्या बाजारात विक्री केली जात आहे, त्यानुसार जिल्ह्याच्या विविध भागात पथके कार्यान्वित करण्यात आली असून त्यांच्या माध्यमातून दररोज जिल्ह्यात कारवाया करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी दिलेल्या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व प्रकारच्या अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी व्यापक स्वरूपावर कारवाई करण्यात येत आहे. पोलिस पथकाने कळवण शहरात कळवण ते देवळा रोडवरील जोगेश्वरी या गोडावूनवर छापा टाकला. या कारवाईत 24 लाख रुपयांचा गहू आणि तांदळाचा साठा जप्त करण्यात आला आहे. या ठिकाणी उपस्थित असलेल्या संशयित अजय मधुकर मालपुरे यांच्या विरूध्द गुन्हा दाखल केला आहे.

(हेही वाचा ६ डिसेंबर ‘शौर्य दिवस’ म्हणून का होतोय ट्विटर ट्रेंड?)

Join Our WhatsApp Community
Get The Latest News!
Don’t miss our top stories and need-to-know news everyday in your inbox.