बे जबाबदार २४५! 

राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई होत आहे. तरीही नागरिक विनामास्क फिरत स्वतःला 'मी बेजबाबदार' दाखवून देत आहेत.

मुंबईत महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलवर बुधवारी, १७ मार्च रोजी धाड टाकली, तेव्हा तिथे सर्रास कोरोनासंबंधीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या २४५ जणांच्या विरुद्ध कारवाई करण्यात आली, त्यांच्या विरोधात गुन्हे दाखल करण्यात आले.

‘अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार’ वर कारवाई!

राज्यात कोरोनाचा कहर वाढत चालला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्ण संख्या वाढत आहे. त्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकार आता गांभीर्याने प्रयत्न करत आहे. विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई करत आहे. तरीही नागरिक विनामास्क फिरत स्वतःला ‘मी बेजबाबदार’ दाखवून देत आहेत. मुंबई महानगरपालिकेच्या “डी” विभाग कार्यालयाच्या पथकाने बुधवारी, १७ मार्च रोजी, रात्री १ वाजताच्या सुमारास ब्रिच कॅन्डी हॉस्पिटलजवळील अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार या हॉटेलवर धाड टाकून तब्बल २४५ विना मास्क ग्राहकांवर कारवाई केली. सामाजिक अंतर न राखणे आणि शासनाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याबद्दल गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातून १९ हजार ४०० रुपयांचा दंडही वसूल करण्यात आला आहे.

(हेही वाचा : जळगाव महापालिकेत सत्तांतर निश्चित, आॕनलाईन सभेला उच्च न्यायालयाची सहमती )

कोरोना नियमांचे उल्लंघन!

अर्बरझीन रेस्टॉरंट अँड बार हे हॉटेल ५० टक्के क्षमतेत सुरु ठेवावे, असे निर्बंध ठेवण्यात आले होते, मात्र त्याचेही उल्लंघन करण्यात आले आहे. तसेच तेथील ग्राहकांनी सामाजिक अंतर ठेवले नव्हते आणि मास्कही लावला नव्हता. त्यामुळे महापालिका अधिकाऱ्यांनी कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी हे हॉटेल बंद केले. राज्य सरकारने कोरोनासंबंधी नवीन नियमावली बनवली आहे. त्यामध्ये हॉटेल, सिनेमागृहे आणि सर्व कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरु ठेवावीत, येणाऱ्या प्रत्येकाने मास्क लावणे सक्तीचे आहे, त्याचे तापमान तपासणे अनिवार्य करण्यात आले आहे. या सर्व नियमांचे या हॉटेलमध्ये उल्लंघन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

Please enter your comment!
Please enter your name here